Lalbaugcha Raja 2023 Shah Rukh Khan esakal
मनोरंजन

Lalbaugh Raja 2023 : किंग खान शाहरुख लालबागच्या राजाच्या चरणी लीन! मुलगा अबरामही सोबत

किंग खान शाहरुख खान हा सध्या तुफान चर्चेत आहे. त्याच्या नावाची केवळ भारतच नाहीतर जगभरातील अनेक देशांमध्ये आहे.

युगंधर ताजणे

Lalbaugcha Raja 2023 Shah Rukh Khan : किंग खान शाहरुख खान हा सध्या तुफान चर्चेत आहे. त्याच्या नावाची केवळ भारतच नाहीतर जगभरातील अनेक देशांमध्ये आहे. शाहरुख हा आता मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनाला आल्यानं भाविकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

बॉलीवूडचे सेलिब्रेटी आणि लालबागचा राजा यांचे नाते बरेच जूने आहे. दरवर्षी लालबागच्या राजाला मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रेटी उपस्थित असल्याचे दिसून आले आहे. यंदाच्या गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या दर्शनाला मोठमोठे सेलिब्रेटी हजेरी लावत आहेत. त्यात किंग खानच्या उपस्थितीनं हजारो भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Also Read - Libya Flood : मृतदेहांचा रस्त्यावर खच,मदतीची केविलवाणी प्रतीक्षा, युद्धाच्या आगीतून बाहेर

किंग खान शाहरुखचा मुलगा अब्राम, मॅनेजर पूजा ददलानी उपस्थित होते. त्यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शाहरुखचं स्वागत करुन त्याचा सत्कार केल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी देखील गणेश चतुर्थीच्या निमित्तानं बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी गर्दी केली होती. त्यात ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्यापासून वरुण धवन पर्यत कित्येकांनी हजेरी लावली होती.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी बॉलीवूडमधील सेलिब्रेटी नेहमीच गर्दी करताना दिसतात. त्यात बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापासून किक्रेटचा देव सचिन तेंडुलकरपर्यत अनेकजण यावेळी लालबागच्या राजाचे दर्शन घेतात. गेल्या दोन दिवसांपासून लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले आहे. त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

Gorakhpur Mumbai Train Bomb Threat : गोरखपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये बॉम्बची धमकी; प्रवशांमध्ये खळबळ अन् शोधमोहीम सुरू

SCROLL FOR NEXT