Lalit Modi reaction on Sushmita-Rohman Breakup viral Esakal
मनोरंजन

Lalit Modi: सुश्मिताचं रोहमनशी ब्रेकअप, खुश होत ललित मोदी म्हणाले होते....

ललित मोदी यांनी सोशल मीडियावर सुश्मिता सेनसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहिर केल्यानंतर सगळीकडे याची जोरदार चर्चा रंगली आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूड दिवा सुश्मिता सेनचं(Sushmita Sen) लव्ह लाइफ नेहमीच चर्चेत राहिलं आहे. तिच्या अफेअरच्या चर्चा नेहमीच बी-टाउनमध्ये रंगलेल्या पहायल्या मिळाल्यात. ६ महिने आधी देखील चाहत्यांना झटका बसला होता जेव्हा अभिनेत्रीनं रोहमन शॉलसोबत(Rohman Shawl) ब्रेकअप(Breakup) केल्याची घोषणा केली होती. दोघांनी ३ वर्ष डेटिंग केल्यानंतर आपले मार्ग वेगळे केले होते. आता सुश्मिता पुन्हा प्रेमात पडली आहे. आणि आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी(Lalit Modi) यांच्यासोबत डेटिंग करत असल्याचं कळलं आहे.(Lalit Modi reaction on Sushmita-Rohman Breakup viral)

काही दिवसांपूर्वी रोहमन आणि सुश्मिताच्या ब्रेकअपच्या बातम्यांची सर्वत्र हवा झाली होती. या बातम्यांना पूर्णविराम लावत २३ डिसेंबर २०२१ ला सुश्मिताने इन्स्टाग्राम अकाउंटवर आपला आणि रोहमनचा एक क्यूट फोटो पोस्ट करत ब्रेकअपची घोषणा केली होती. तुम्ही हे ऐकून हैराण व्हाल की सुश्मिता सेनच्या या ब्रेकअप पोस्टवर तिचे सध्याचे बॉयफ्रेंड ललित मोदी यांनी 'लाइक' केलं होतं. आपल्या पोस्टमध्ये सुश्मिता सेनने लिहिलं होतं कि तिचं नातं भले संपलं असलं तरी प्रेम बाकी आहे. ते दोघे नेहमी चांगले मित्र बनून राहतील.

Lalit Modi reaction on Sushmita-Rohman Breakup viral

सुश्मिताने सांगितलं होतं की तिचं रोहमनसोबतचं नातं खूप आधी संपलं होतं. दोघांमध्ये आता फक्त प्रेम बाकी आहे. नातं तूटल्यानंतरही रोहमन आणि सुश्मिता चांगले मित्र आहेत. नेहमी दोघे एकमेकांसोबत दिसतात. रोहमनला अनेकदा सुश्मिताच्या घरी देखील स्पॉट केलं जातं. रोहमनचं सुश्मिताच्या मुलींशी खूप छान बॉन्डिंग आहे. रोहमन सुश्मितापेक्षा खंरतर १६ वर्षांनी लहान होता. दोघांच्या ब्रेकअपनं त्यांच्या चाहत्यांना मात्र चांगलाच झटका लागला होता.

Sushmita's breakup post

सुश्मिता आणि ललित मोदीविषयी बोलायचं झालं तर ते दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत. दोघांचे २०१३ साली ट्वीटरवरचे चॅट देखील आता जोरदार व्हायरल होत आहेत. सुश्मिता आणि ललित मोदी यांच्या जुन्या फोटोंना पाहून लक्षात येतं की एकमेकांना डेट करण्यापूर्वी ते दोघे खूप चांगले मित्र होते. कपलच्या रोमॅंटिक फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच हवा झाली आहे. अनेक नेटकऱ्यांनी मात्र दोघांच्या रिलेशनशीपची खिल्ली उडवलेली पहायला मिळते आहे.

सुश्मिता सेनच्या आयुष्यात अनेकदा प्रेम आलं,पण कोणतंच नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. आता ललित मोदीसोबत तरी जे आहे ते प्रेम असावं,आणि लग्नापर्यंत ती गाडी पोहोचावी एवढी आशा. अर्थात ही इच्छा सध्या ललित मोदींनी तरी केली आहे. सुश्मिताची यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Health Update : शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज ! चार दिवसाच्या विश्रांतीनंतर घरी परतणार

Latest Marathi News Live Update : नळदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी १४ कोटींचा विकास आराखडा

आई झाल्यावर पहिल्यांदाच दिसली कतरिना, चाहत्यांना बघत क्यूट स्माइल देत केलं असं काही की... VIRAL VIDEO

Stock Market Today : शेअर बाजाराची हिरव्या रंगात सुरुवात! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; IT शेअर्समध्ये वाढ; कोणते शेअर्स तेजीत?

Donald Trump : कोट्यवधी लोकांचा बळी गेला असता, भारत-पाक अणुयुद्ध मी थांबवले; ट्रम्प यांचा पुनरूच्चार

SCROLL FOR NEXT