lalit prabhakar driving bus while shooting in shantit kranti 2 web series  SAKAL
मनोरंजन

Lalit Prabhakar: ललित प्रभाकरला माणसांच्या गर्दीत का चालवावी लागली बस? शांतीत क्रांती 2 च्या भन्नाट शूटींगचा अनुभव

ललित प्रभाकरने माणसांच्या गर्दीत गाडी चालवतानाचा अनुभव शेअर केलाय

Devendra Jadhav

Lalit Prabhakar News: ललित प्रभाकर हा मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतला अभिनेता. ललितने आजवर आनंदी गोपाळ, झोंबिवली, तुझं तू माझं मी, हंपी अशा अनेक सिनेमांमधून त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवलीय.

ललित प्रभाकर लवकरच शांतीत क्रांती 2 मध्ये झळकणार आहे. ललित प्रभाकरला शांतीत क्रांती 2 च्या शुटींगदरम्यान बस चालवण्याचा अनुभव मिळालाय.

'शांतीत क्रांती २'च्‍या शूटिंगदरम्‍यान प्रसन्‍नची भूमिका साकारणारा ललित प्रभाकरने त्‍यांच्‍या जीवनात पहिल्‍यांदाच ड्रायव्‍हर बनत बस चालवण्‍याचा अनुभव घेतला.

इतकंच नव्हे बस चालवताना त्याने अभिनय व संवादामध्‍ये संतुलन राखत सर्वांच्‍या सुरक्षिततेची खात्री घेत सराईतपणे गाडी चालवली.

हे आव्‍हानात्‍मक टास्‍क करण्‍याबाबत ललित प्रभाकर म्‍हणाले, ''या सीझनमध्‍ये मी माझ्या आयुष्यात पहिल्‍यांदाच बस चालवण्‍याचा अनुभव घेतला. मला बस चालवण्‍याच्‍या जबाबदारीसह ड्रायव्हिंग करताना संवाद बोलण्याचे व सीन्‍स परफॉर्म करण्‍याचे आव्‍हान देखील होते. या गुंतागूंतीमध्‍ये अधिक भर म्‍हणजे आम्‍हाला गजबजलेल्‍या रस्‍त्‍यावर शूटिंग करायची होती, जे खूप आव्‍हानात्‍मक होते. असे अडथळे असताना देखील आमचे दिग्‍दर्शक व संपूर्ण टीमने हे आव्‍हान पूर्ण करण्‍याच्‍या माझ्या क्षमतेवर विश्‍वास दाखवला. तसेच सर्वांच्‍या सुरक्षिततेची खात्री देखील घेतली. मला सांगावेसे वाटते की, बस चालवताना भूमिकेमध्‍ये सामावून राहणे अत्‍यंत आव्‍हानात्‍मक होते. पण, तो अत्‍यंत अनोखा अनुभव होता, जो माझ्या स्‍मरणात सदैव राहिल.''

भाडीपासोबत सहयोगाने टीव्‍हीएफद्वारे निर्मित आणि अरूनभ कुमार यांची निर्मिती असलेली सिरीज 'शांतीत क्रांती २'चे दिग्‍दर्शक सारंग साठये व पौला मॅकग्लिन आहेत. या सिरीजमध्‍ये अभय महाजन, अलोक राजवडे, ललित प्रभाकर, मृण्‍मयी गोडबोले, प्रिया बॅनर्जी व प्रियदर्शिनी इंदळकर प्रमुख भूमिकेत आहेत. पहा 'शांतीत क्रांती सीझन २' १३ ऑक्‍टोबरपासून फक्‍त सोनी लिव्‍हवर!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Bench Notification : आनंदाची बातमी ! ४० वर्षांच्या लढ्याला यश, उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाला मान्यता; 'या' तारखेपासून होणार सुरु

Georai Crime : अल्पवयीन मुलीस फुस लाऊन पळवणारे दोघे नाशिक येथे जेरबंद; पोलिसांना दीड महिना देत होते गुंगारा!

Yavat Violence: यवतमध्ये कलम १४४ लागू, परिस्थिती नियंत्रणात; अफवांवर विश्वास ठेवू नका, अजित पवारांचे आवाहन

Raksha Bandhan Astrology Alert: रक्षाबंधनच्या दिवशी शनि-मंगळ येणार आमने-सामने, या ३ राशींना बाळगावी लागणार सावधगिरी

Rajya Shetti : 'माधुरी' हत्तिणीसाठी पेटाच्या अधिकाऱ्यांनी २ कोटींची दिली होती ऑफर.....! राजू शेट्टींचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT