Lalu Prashad Yadav Biopic Esakal
मनोरंजन

Lalu Prashad Yadav Biopic: आता लालू प्रसाद यादव यांच्यावर येणार बायोपिक! प्रकाश झा करणार निर्मिती

लालू प्रसाद यादव यांनी राजकारणात विविध पदांवर काम केले आहे. आता त्यांच्यावर चित्रपट तयार करण्यात येणार आहे.

Vaishali Patil

Lalu Prashad Yadav Biopic: राष्ट्रीय जनता दलचे सुप्रिमो लालू प्रसाद यादव हे त्यांच्या देसी शैली आणि विचित्र विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. ते केवळ त्यांच्या राजकीय कार्यासाठीच नाही तर त्यांच्या अनेक विधानांसाठीही चर्चेत होते.

आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेकांना पराभूत केले. तर आपल्या विनोदी शैलीने सर्वांना हसवले देखील आहे.

मात्र सर्वांना हसवणाऱ्या लालू प्रसाद यादव यांच्या जीवनातही अनेक चढ उतार आले आहेत. आता लालू यादव यांच्या आयुष्यावर चित्रपट तयार करण्यात येणार आहेत. ज्यात सर्वांना लालू प्रसाद यादव यांच्या जीवनाबद्दल कळणार आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा बायोपिक तयार करण्यात येणार आहे ज्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

राष्ट्रीय जनता पक्षाने याबाबत माहीती दिली आहे. या चित्रपटावर काम सुरु झाले असून जवळपास 5- 6 महिन्यापासून या चित्रपटाची तयारी सुरु करण्यात आली आहे. यादव कुटुंबाने या चित्रपटाचे हक्क घेतल्याचे बोलले जात आहे.

या बायोपिकचे नाव लालटेन असेल अशी चर्चा आहे . कारण लालटेन हे लालू यादव यांच्या राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे.

लालू प्रसाद यादव यांच्यावर तयार करण्यात येणाऱ्या चित्रपटाची निर्मिती प्रकाश झा यांच्या प्रोडक्शन हाऊसद्वारे करण्यात येणार आहे. इतकच नाही तर तेजस्वी प्रसाद यांनी या चित्रपटात गुंतवणुक केली सिनेमाला आर्थिक पाठबळ दिल्याचं वृत्त आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा व्हायची आहे. याविषयी प्रकाश झा यांना विचारलं असता ते फक्त हसले मात्र प्रतिक्रिया दिली नाही.

या चित्रपटात लालू यादव यांची भुमिका कोण साकारेल याबाबत माहीती अद्याप समोर आलेली नाही तरी चित्रपटाच्या कास्टिंगचे काम सुरु असून यात बॉलिवूडमधील कलाकरांना घेण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत. या वर्षी बायोपिकचे शुटिंग सुरु होणार असून पुढच्या वर्षी हा बायोपिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाचे उद्घाटन चर्चेत

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT