lata mangeshkar birth anniversary : lata mangeshkar behind singer she is composer painter photographer lyricist
lata mangeshkar birth anniversary : lata mangeshkar behind singer she is composer painter photographer lyricist  sakal
मनोरंजन

Lata mangeshkar: शाळेत न जाता 29 भाषा, चित्रकार आणि बरच काही होत्या लता दीदी..

सकाळ डिजिटल टीम

lata mangeshkar: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज जयंती. 6 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पण त्यांचा अजरामर स्वर मात्र त्यांनी अनंत काळासाठी मागे ठेवला. आज 28 सप्टेंबर रोजी त्यांची पहिली जयंती. या निमित्ताने देशभरात नाही तर जगभरात त्यांना अभिवादन करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. त्याच निमित्ताने जाणून घेऊया गायनापलीकडच्या लता दीदी...

ज्या आवाजानं केवळ भारतालाच नाही तर साऱ्या जगातील संगीतप्रेमींना आपल्या सुरावटींनी वेड लावलं त्या दीदींच्या आठवणींना आज सर्वत्र उजाळा दिला जात आहे. लता दिदींनी त्यांच्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली. त्यांच्या सारखी प्रतिभावान गायिका आजच्या युगात शोधूनही सापडणार नाही. लता दिदींच्या अनेक मुलाखती आपण आपण ऐकतो, त्या हिंदी, मराठी, इंग्रजी अशा अनेक भाषा सहज बोलायच्या आणि गायच्या देखील. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल हे ऐकून, की लता मंगेशकर कधीही शाळेत गेल्या नाही. त्यांची केवळ एकच दिवस शाळा झाली होती.

ज्या आवाजानं केवळ भारतालाच नाही तर साऱ्या जगातील संगीतप्रेमींना आपल्या सुरावटींनी वेड लावलं त्या दीदींच्या आठवणींना उजाळा देण्याचे काम चाहते करत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमातून दीदींना आदरांजली वाहत त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दीदींचे जाणे हे तमाम भारतीयांच्या काळजाला छेद करुन जाणारी गोष्ट होती. मात्र त्यांचे सूर हे आपल्या मनात घर करुन आहे. त्यांच्या सुरावटीत आपण प्रत्येक जण चिंब झाल्याची भावना मोदींनी यावेळी व्यक्त केली आहे.

त्यांच्या भगिनी उषा मंगेशकर या मुलाखतीत म्हणाल्या होत्या, " दिदीचे शालेय जीवन एकच दिवसाचे होते. पण तीने २९ भाषेत गायली. ती हिंदी, उर्दू, बंगाली, पंजाबी या भाषा शिकली. मराठीचा, देशाचा तीला अभिमान होता. छत्रपती शिवाजी महाराज हे दिदीचे दैवत होते. ती खुप धाडसी होती. बांगलादेश युध्द झाल्यावर तिने तेथे जावुन आपल्या सैनिकांसाठी २७ गाण्याचे कार्यक्रम केले. "

लता मंगेशकर केवळ गायिका नव्हत्या तर त्यांना भाषेची उत्तम जाण होती. त्यांनी गीतलेखनही केले आहे. याशिवाय त्या संगीतकारही होत्या. लता दिदींची एक खास बात म्हणजे त्यांना फोटोग्राफीची प्रचंड आवड होती. त्यांनी कॅमेऱ्याचे तंत्र पूर्णतः जाणून घेतले आणि त्या उत्तर फोटोग्राफी करू लागल्या. आपल्या सूरांनी सर्वांच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या लता दीदी खऱ्या रंगासोबतही तितक्याच लीलया वावरत असे. त्या उत्तम चित्रकार होत्या. गायिका म्हणून जगाला परिचित असणाऱ्या लता मंगेशकर यांनी कधीकाळी अभिनयही केला होता. अशा लता मंगेशकर केवळ गायिका नाही तर अनेक कलांनी समृद्ध होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT