lata mangeshkar  google
मनोरंजन

Lata Mangeshkar: लता दीदींची स्वप्नपूर्ती! कलाकारांसाठी वृद्धाश्रमाची होणार निर्मिती

भारतातच नाहीतर जगभरामध्ये ज्यांच्या आवाजाचे चाहते आहेत अशा गानकोकिळा लता मंगेशकरांनी चाहत्यांना अक्षय आनंद दिला.

युगंधर ताजणे

Lata Mangeshkar News: भारतातच नाहीतर जगभरामध्ये ज्यांच्या आवाजाचे चाहते आहेत अशा गानकोकिळा लता मंगेशकरांनी चाहत्यांना अक्षय आनंद दिला. त्यांच्या आवाजाची जादू कायम आहे. लता दीदींच्या जाण्यानं भारतीय संगीत (Indian Music News) विश्वावर मोठा आघात झाल्याचे दिसून आले. देश शोकसागरात बुडून गेला होता. दीदींनी आपल्या हयातीत वेगवेगळे सामाजिक (Singer Lata Mangeshkar) उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांचे सामाजिक योगदान हा नेहमीच चर्चिला जाणारा विषय आहे. आता लता दीदींच्या नावानं एका वृद्धाश्रमाची निर्मिती केली जाणार आहे.

लहानांपासून ज्येष्ठांपर्यत लता दीदींच्या गाण्याचे चाहते जगभर पसरले आहेत. (Indian Singer) लता दीदींच्या नावानं काही समाजपयोगी उपक्रम सुविधा सुरु करता येतील का याची चर्चा सुरु होती. आता दीदींचं स्वप्न पूर्ण होणार आहे. ते म्हणजे वृद्धाश्रमाची उभारणी. भारतीय संगीत विश्वातील अनेक गोष्टींसाठी लता दीदींनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांनी सढळ हातानं मदत केली. त्यामुळे भारतीय संगीत विश्व हे नेहमीच त्यांची ऋणी राहणार आहे.

काही दिवसांपूर्वी दीदींच्या नावानं संगीत विद्यालय सुरु करण्याविषयी देखील चर्चा सुरु होती. ते काम देखील पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात आले आहे. आता लता मंगेशकर यांच्या इंस्टा अकाउंटवरुन एक पोस्ट शेयर करण्यात आली आहे. त्यामध्ये लता मंगेशकर यांचे एक स्वप्न पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे की, देशाच्या गानकोकिळा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी एक स्वप्न उराशी बाळगले होते. आता ते पूर्ण होणार आहे.

वृद्धाश्रमाची निर्मिती करणं हे दीदींचं स्वप्न होतं. ते अशा लोकांसाठी की जे संगीत, आर्ट, चित्रपट आणि थिएटरशी संबंधित आहे. त्यांच्याकरिता वृद्धाश्रमाची निर्मिती केली जाणार आहे. त्या फाउंडेशनचे म्हणणे आहे की, ज्या कलाकारांनी कला क्षेत्रासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे, त्यांनी अथक संघर्ष केला आहे. मात्र ते एकटे आहेत. कुटूंबापासून दुरावले गेले आहेत. त्यांच्यासाठी या महत्वांकांक्षी प्रोजेक्टची निर्मिती करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ESIC New Rules 2026 : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजारपण आणि प्रसूती लाभांसाठी अर्जाची गरज नाही; पैसे थेट बँक खात्यात जमा होणार

Gadchiroli History: गडचिरोलीच्या घनदाट जंगलात इतिहासाचा खजिना! १६व्या-१७व्या शतकातील ५० वीरगळांचा शोध, शूरवीरांच्या पराक्रमाची शिल्पे उजेडात

IND A vs PAK A: भारत पाकिस्तान सामन्यात टॉसवेळी नेमकं काय घडलं? होत, मॅच रेफ्रींच्या चुकीमुळे वाद, पाकिस्तानी चाहत्यांनी केले आरोप

Water Security 2051 : पुणे महानगर प्रदेशाच्या पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन; जलसंपदा विभागाचा २०५१ पर्यंतचा जलसुरक्षा आराखडा तयार होणार

Palodwadi Robbery: पालोदवाडीत चार चोरट्यांचा धुमाकूळ; चार घरांवर दरोडा, महिलांच्या गळ्याला चाकू लावून ३.३२ लाखांचा ऐवज लुटला

SCROLL FOR NEXT