Lata Mangeshkar Google
मनोरंजन

लता मंगेशकर यांना भेटण्यास कुणालाही परवानगी नाही; डॉक्टरांनी दिली माहिती

सकाळ डिजिटल टीम

लता मंगेशकर यांच्यावर ब्रीच कँडीमध्ये आय़सीयुत तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केले जात आहेत.

मुंबई - गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) या गेल्या आठवड्याभरापासून रुग्णालयात आहेत. गेल्या शनिवारी त्यांची कोरोना (Corona) चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देण्यात आली आहे. वयोमानानुसार त्यांची काळजी घेण्याची गरज असल्यानंच त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लता मंगेशकर यांच्यावर ब्रीच कँडीमध्ये आय़सीयुत डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केले जात आहेत.

लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतित सामदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर आणखी काही दिवस उपचार करण्यात येतील. त्यांची प्रकृती आधीप्रमाणेच स्थिर आहे. कोणालाही त्यांना भेटण्याची परवानगी नाही असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

प्रकृती स्थिर असली तरी त्यांना कोविड न्युमोनिया झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली आणखी काही दिवस ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळते. लता दीदी लवकर कोरोना मुक्त होवोत आणि सुदृढ घरी परत येवोत अशी प्रार्थना चाहते करत आहेत. तसंच लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांनी चाहत्यांसह सर्वांनाच कुटुंबाची प्रायव्हसी जपण्याचं आवाहन केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT