shivaji satam and lata mangeshkar sakal
मनोरंजन

अचानक लता दीदींनी शिवाजी साटम यांच्या डोक्यावर बंदूक ठेवली आणि...

'दया तोड दो ये दरवाजा' म्हणणाऱ्या शिवाजी साटम यांच्या वाढिवसानिमित्त लता दीदींची खास आठवण. जेव्हा त्या CID च्या सेटवर गेल्या होत्या..

नीलेश अडसूळ

मालिकामी नाटक, चित्रपट अशा तीनही माध्यमातून चौकस अभिनयाने ज्यांनी बॉलीवूड मधेही आदराचं स्थान निर्माण केलं त्या शिवाजी साटम यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने ही एक खास आठवण...

शिवाजी साटम (shivaji satam) हे नाव जवळपास हे लहानमुलापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांना परिचित आहेत. त्यांचे कारणही तसेच खास आहे. सोनी वाहिनीवरील (sony) 'सीआयडी' (CID) या कार्यक्रमातून जवळपास १५ वर्षांहून अधिक काळ ते प्रेक्षकांच्या भेटीला येत होते. त्यांनी साकारलेले एसीपी प्रद्युम्न (ACP pradyumna) हे पात्र अविस्मरणीय ठरले, म्हणजे आजही घराघरात त्या मालिकेच्या आठवणी तशाच आहेत. लाखोंचा चाहतावर्ग मिळवणाऱ्या या मालिकेने चक्क गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनाही (lata mangeshkar) भुरळ घातली होती. विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे.

लता मंगेशकर या केवळ गायिका नव्हत्या तर त्यात चित्रकार, छायाचित्रकार, संगीतकार अशा विविध कलेत मुशाफिरी करत होत्या. त्या उत्तम लिहीत असे. शिवाय कलासक्त असल्याने त्यांना एकूणच कलांविषयी ओढ होती. आजूबाजूला कलाक्षेत्रात काय सुरू आहे. याकडे त्यांचे बारीक लक्ष असायचे. अशाच एका मालिकेच्या त्या दिवान्या होत्या, ती म्हणजे CID. गुन्हेगारांना शोधून त्यांना शिक्षा करणारी अशी ही मालिका अनेक वर्ष आपलं मनोरंजन करत होती. त्यातल्या पात्रांचे संवादही प्रेक्षकांना पाठ झाले होते. लता दीदी हि मालिका आवर्जून पाहायच्या. त्यांना ही मालिका इतकी आवडे की त्या ही मालिका पाहूनच झोपायच्या.

CID मधील या कलाकारांचे कौतुक करण्यासाठी त्यांनी एकदा सेटवर ज्याण्याचा निर्णय घेतला आणि त्या पोहोचल्याही. तिथे त्यांनी सर्व कलाकारांचे भरभरून कौतुक केले. त्यांना भेटवस्तू दिल्या. त्यांच्या सोबत फोटोही काढले. यावेळी लता दीदींनी चक्क बंदूक हातात घेऊन ती शिवाजी साटम यांच्यावर रोखली होती. हे सगळे फोटो लता मंगेशकर यांनी एका खास निमित्ताने शेअर केले होते. ते निमित्त होते शिवाजी साटम यांच्या ७० व्या वाढदिवसाचे. (shivaji satam birthday)

दोन वर्षांपूर्वी म्हणजे २१ एप्रिल २०२० रोजी शिवाजी साटम यांनी आपला ७० वा वाढदिवस साजरा केला होता. यावेळी लता मंगेशकर (lata mangeshkar news) यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून CID च्या सेटवरील फोटो शेअर करत शिवाजी साटम यांना शुभेच्छा दिल्या होत्या. 'मी शिवाजी साटम यांना वाधिवासाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि CID ही मालिका लवकरच पुन्हा सुरु व्हावी अशी मी मनोकामना व्यक्त करते' असे ट्विट लता दीदींनी केले होते. आज शिवाजी साटम यांचा ७२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने हि खास आठवण. (shivaji satam age)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

चाकूने गळा चिरून महिलेची हत्या; अहिल्यानगर जिल्हा हादरला, नवऱ्याचे शेजारच्यांना फाेन, दरवाजा उघडला अन् धक्काच बसला..

'नगर तालुक्यातील कांदा व्यापाऱ्याची ८२ लाखांची फसवणूक'; अनेक दिवस कांदा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला अन्..

दुर्दैवी घटना! 'बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू'; संगमनेर तालुक्यातील घटना, आईचा काळीज पिळवटणारा आक्राेश, अंगणात खेळत हाेता अन्..

SCROLL FOR NEXT