मनोरंजन

लतादीदी अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर (lata Mangeshkar) यांचे आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच बॉलीवूडवर शोककळा पसरल्याचे दिसून आले. तसेच राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी देखील लतादीदींच्या निधनावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. गेल्या दोन आठवड्यांहून अधिक काळ लता दीदी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होत्या. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर डॉक्टर सर्वोतोपरी उपचार करत होते. मात्र मल्टिपल ऑर्गन फेल्युयर झाल्यानं त्यांची प्रकृती आणखी खालावल्याचे सांगण्यात आले होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हिंदीसह ३६ हून अधिक प्रादेशिक भाषांमध्ये लता दीदींनी हजारो गाणी गायली आहेत. सायंकाळी सातच्या दरम्यान त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हृदयनाथ मंगेशकर यांचे सुपुत्र आदिनाथ मंगेशकर यांनी त्यांना अग्नी दिला. यावेळी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यापूर्वी मंगेशकर कुटूंबियांच्या प्रभूकुंज या निवासस्थानी कित्येक सेलिब्रेटींनी दीदींच्या पार्थिवाचे दर्शन घेतले होते. त्यामध्ये अमिताभ बच्चन, संजय लीला भन्साळी, राज ठाकरे यांच्यासह राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. शिवाजी पार्कवर त्यांना अभिवादन करण्यासाठी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह इतरही अनेक राजकीय मान्यवर उपस्थित होते. कलाक्षेत्रातील शाहरुख खान, रणबीर कपूर, आमीर खान, जावेद अख्तर, श्रद्धा कपूर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

अंत्यदर्शनासाठी चाहत्यांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. गायिका लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ पश्चिम बंगाल सरकारने उद्या अर्धा दिवस सुट्टीचा निर्णय जाहिर केला आहे. असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जीनी घोषणा केली आहे. तर महाराष्ट्र राज्य सरकारनं उद्या सार्वजनिक सुट्टी जाहिर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT