Lata Mangeshkar esakal
मनोरंजन

Lata Mangeshkar: आमचं दैवत हरवलं...; वैशाली सामंत

संगीतकार म्हणून माझं एक स्वप्न होतं, की आपण संगीत दिलेली एखादी रचना लतादीदींच्या स्वरात रेकॉर्ड व्हावी.

सकाळ वृत्तसेवा

संगीतकार म्हणून माझं एक स्वप्न होतं, की आपण संगीत दिलेली एखादी रचना लतादीदींच्या स्वरात रेकॉर्ड व्हावी. तो योग २०१४ मध्ये जुळून आला. मी संगीत दिलेलं ते गीत, ती रचना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची होती. ते काव्य माझ्यासमोर आल्यापासून मला वाटत होतं, की ते लतादीदींनी गायलं पाहिजे. मी लतादीदींना फोन केला. त्यांनी ती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची रचना ऐकली. त्यांना ती आवडली आणि त्यांनी ते गीत गाण्यास होकार दिला. हे माझं खूप मोठं भाग्य आहे. (Lata Mangeshkar)

लतादीदी ते गीत गाण्यास २०१४मध्ये सरस्वती पूजेच्या दिवशी अंधेरीच्या ‘स्वरलता’ स्टुडिओत आल्या. त्यांनी गाण्याचा पूर्ण अभ्यास केला होता. गाण्याच्या रचनेबद्दल आम्ही आधी बोललो होतो. माझ्यासाठी ती खूप मोठी झेप होती. साक्षात सरस्वतीदेवी माझ्यासाठी गायल्या आल्या, हे माझ्या मनात कोरलं गेलेलं वाक्य आहे. आम्ही चार-पाच तास स्टुडिओत होतो. त्यांनी मला आशीर्वाद दिला, ‘तू खूप मोठी संगीतकार होशील. तू चांगले गाणे केले आहेस.’ मी खूप भारावून गेले. त्यांना नमस्कार करताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.

शुद्धता, सात्त्विकता आणि कुशाग्र बुद्धी या तिन्ही गोष्टी मला त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून जाणवल्या. उच्चारातील परिपूर्णता, एक्स्प्रेशन्समधील परफेक्शन काय काय सांगू त्यांच्याबद्दल? माझ्यासाठी एका विद्यापीठात प्रवेश घेतल्यासारखं होतं. त्या उभ्या कशा राहतात, माईकसमोर त्यांचा फोकस कसा असतो, हे सगळं प्रत्यक्ष पाहता आलं. आपलं आयुष्य त्यांच्या गाण्यांनी व्यापून गेलं आहे.

एक पर्व संपलं, असं आता म्हणावं लागतंय. त्या एक उत्तम संगीतकार होत्या. शब्दांची सुंदर जाण, चांगले शब्द चांगल्या रचनेत गुंफून ते सादर करणं हे खूप महत्त्वाचं आहे, हे त्यांच्याकडून शिकता आलं. संगीत क्षेत्रात प्ले-बॅक सिंगर्सना मानाचं स्थान मिळवून देण्याचं श्रेय हे लतादीदींना जातं. पडद्यावर अभिनेता व अभिनेत्रीच्या नावाप्रमाणं गायक- गायिकांची व संगीतकारांची सुद्धा नावं आली पाहिजेत, अशी आग्रही भूमिका त्यांची होती. आज प्लेबॅक सिंगर्सना हा मान मिळाला तो त्यांच्यामुळेच.

प्ले बॅक सिंगर्सना योग्य मान आणि योग्य मानधन सुद्धा मिळालं पाहिजे,यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्यामुळे प्लेबॅक सिंगिंगला स्वतःची ओळख मिळाली. आज करिअर म्हणून आम्ही प्ले बँक सिंगिंगकडं पाहू शकतो, याचं श्रेय मी लतादीदींना देईन. त्यांनी स्वतःचा विचार केला नाही, तर संपूर्ण संगीत क्षेत्राचा, संपूर्ण इंडस्ट्रीचा विचार केला. आपली इंडस्ट्री पुढं कशी जाईल हा विचार त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : मोदी सरकारला धक्का! निवडणूक आयुक्तांबाबतच्या कायद्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाची नोटीस, मागितलं उत्तर

Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभवला वर्ल्ड कप स्पर्धेत ५ मोठे विक्रम मोडण्याची संधी; विराट, शिखर, शुभमन यांचे विक्रम तुटणे निश्चित

Labor Law Changes: Layoff झाला तरी खात्यात पैसे येणार? ‘पुनर्कौशल्य निधी’मुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! वाचा संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Kolhapur Election : ‘लाडकी बहीण’ला विरोध करणाऱ्या काँग्रेसला बहिणीच धडा शिकवतील; खासदार धनंजय महाडिकांचा थेट हल्लाबोल

Mohol Politics: स्वीकृत नगरसेवकासाठी भाजपचे दोन डझन इच्छुक; उपनगराध्यपदाची लॉटरी कोणाला लागणार? मोहोळकरांचे लक्ष!

SCROLL FOR NEXT