Lata Mangeshkar 
मनोरंजन

लतादीदींची प्रकृती स्थिर; कुटुंबीयांनी दिली माहिती

लतादीदींना कोरोनाची लागण झाल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

स्वाती वेमूल

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना कोरोनाची लागण झाल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. लतादीदींना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत, मात्र त्यांचं वय ९२ वर्षे असल्याने त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती मंगेशकर कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आली. लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा असून त्या बऱ्या होत असल्याची माहिती त्यांची भाची रचना शाह यांनी मंगळवारी दिली. (Lata Mangeshkar health update)

लतादीदींची प्रकृती ठीक आहे. कोरोनातून बरं होण्यासाठी किमान सात दिवस लागतात, त्यामुळे लतादीदींना अजून रुग्णालयातच उपचार घ्यावे लागतील, असंही त्यांच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केलं. 'न्यूज १८'ला दिलेल्या मुलाखतीत रचना म्हणाल्या, "लतादीदींची प्रकृती स्थिर आहे. देवाची कृपा आहे. दीदी लढतात आणि जिंकूनच येतात, अशीच आमच्यात त्यांची ओळख आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या देशभरातील त्यांच्या चाहत्यांचे मी आभार मानते. जेव्हा प्रत्येकजण प्रार्थना करतो तेव्हा कोणतीही चूक होऊ शकत नाही."

ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉ. प्रतीक समदानी आणि त्यांचं पथक लतादीदींवर उपचार करत आहेत. लतादीदींना कोविड न्युमोनिया झाला असून पुढील सात-आठ दिवस त्यांना रुग्णालयातच राहावं लागेल, असं डॉ. समदानी यांनी पत्रकारांना सांगितलं. लतादीदींना शनिवारपासूनच ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं असून ऑक्सिजनची गरज भासली नाही. त्यांचं वय पाहता डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: विवाहित जोडपी घटस्फोटाशिवाय लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू शकत नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Ohh Shit... मुंबई इंडियन्सचा उद्या सामना अन् दोन स्टार खेळाडू खेळणार नसल्याची धडकली बातमी, दोघांनी गाजवलाय T20 WC 2026

Solapur : उजव्या ऐवजी डाव्या हाताचं बोट कापलं, चिमुकला सांगत होता तरी महिला डॉक्टरने ऑपरेशन केलं; कुटुंबियांचे आरोप

अखेर बी.एड सीईटी झालीच नाही; सीईटी सेलचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांचा गोंधळ, शेकडो विद्यार्थी मुकले परीक्षेला

दहावी बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखा आल्या समोर

SCROLL FOR NEXT