Late actor Chiranjeevi Sarja
Late actor Chiranjeevi Sarja  
मनोरंजन

पत्नी गरोदर असताना अभिनेत्याचं निधन; चिमुकल्याकडून वडिलांच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

स्वाती वेमूल

कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता चिरंजीवी सरजा यांचे जून २०२० मध्ये निधन झाले. वयाच्या ३९ व्या वर्षी चिरंजीवी यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचं निधन झालं होतं. चिरंजीवी सरजा यांच्या निधनाच्या वेळी त्यांची पत्नी मेघना गरोदर होती. त्यांना त्यांच्या मुलाचा चेहरासुद्धा पाहता आला नव्हता. मात्र आता त्यांच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर त्यांच्या पाच महिन्यांच्या मुलाच्या हातून लाँच करण्यात आला आहे. या ट्रेलर लाँचचा व्हिडीओ मेघनाने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

या व्हिडीओमध्ये चिमुकला चिरू आईच्या मांडीवर बसला असून आई मेघनाने त्याच्या हातून ट्रेलर लाँच केला आहे. चिरंजीवी सरजा निधनापूर्वी 'राजमार्तंड' या शेवटच्या चित्रपटाची शूटिंग करत होते. त्यावेळी लॉकडाउन घोषित झाला आणि शूटिंग थांबवली गेली. मात्र तोपर्यंत चिरंजीवी यांनी चित्रपटातील त्यांचा भाग जवळजवळ पूर्ण केला होता. उर्वरित भागाची शूटिंग त्यांचा भाऊ ध्रुवा सरजाने पूर्ण केली. 

पत्नी मेघना व चिरंजीवी आपल्या पहिल्या बाळाच्या जन्माची वाट पाहत होते. हे दोघं दहा वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. मेघनासुद्धा अभिनेत्री आहे. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाउनदरम्यान २ जून २०२० रोजी चिरंजीवी यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने बंगळुरू इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 

चिरंजीवी यांनी २००९ मध्ये ‘वायुपूत्र’ या चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. याशिवाय त्यांनी अम्मा आय लव्ह यू, राम लीला, चंद्रलेखा, चिररु या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी वयाच्या २२ व्या वर्षी अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: कर्णधार ऋतुराजचं शानदार अर्धशतक; ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराटलाही टाकलं मागे

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT