late actor kader khan son abdul quddus from his first wife passed away at canada 
मनोरंजन

कादर खान यांच्या मोठ्या मुलाचे निधन 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  बॉलीवूडचे दिवंगत प्रसिध्द अभिनेते कादर खान यांच्या मोठ्या मुलाचे अब्दुल कुद्दुसचं निधन झालं आहे. त्याच्या बातमीचे वृत्त ऐकताच बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. मीडियाच्या रिपोर्टनुसार अब्दुल कद्दुस यांनी कॅनडामध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. ते कादर खान यांचा मोठा मुलगा म्हणून त्यांची ओळख होती. कादर खान यांनी तीन मुले. त्यापैकी अब्दुल हा त्यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा होता. अब्दुल हे चित्रपटांपासून लांब असणा-यापैकी एक होते. ते कॅनडा एअरपोर्टवर एक सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला होते. 2018 मध्ये कादर खान यांचे निधन कॅनडामध्ये झाले होते.

कादर खान यांच्या तिन्ही मुलांमध्ये अब्दुल हे मोठे होते. त्यानंतर सरफराज आणि शहनवाज हे आहेत. विरल भियानी यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन ही माहिती शेअर केली आहे. त्यांनी ही बातमी प्रसिध्द केल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात चाहत्यांकडून प्रतिसाद मिळाला आहे. चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. अनेकांनी अब्दुलला श्रध्दांजली वाहिली आहे.

अब्दुल यांचे वडिल कादर खान यांचे 2018 मध्ये वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले होते. काही तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले होते. त्यांनी जवळपास 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. कादर खान यांची दोन मुले सरफराज आणि शहनवाज खान हे बॉलीवू़डशी जोडले गेले आहेत. अभिनेता आणि निर्माता म्हणून त्यांनी काम केले आहे. मात्र त्यांचा सर्वात मोठा मुलगा अब्दुल हा लाईम लाईट पासून दुर होता. तो सिक्युरिटी ऑफिसर म्हणून काम करत होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT