late actress Nutan's bungalow in Thane collapsed due to heavy rain  SAKAL
मनोरंजन

Nutan Bungalow Collapse: मुसळधार पावसामुळे दिवंगत अभिनेत्री नूतन यांच्या ठाण्यातील बंगल्याचा भाग कोसळला

मुसळधार पावसामुळे अभिनेत्री नूतन यांच्या बंगल्याचा काही भाग कोसळल्याची बातमी समोर आलीय.

Devendra Jadhav

Nutan Bungalow Collapse News: सध्या महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाला मुसळधार पावसाने झोडपून काढलंय. अनेक ठिकाणी घरांचं नुकसान झालंय.

अशातच मुसळधार पावसामुळे अभिनेत्री नूतन यांच्या बंगल्याचा काही भाग कोसळल्याची बातमी समोर आलीय.

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात मंगळवारी दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री नूतन यांच्या बंगल्याचा बाल्कनी आणि काही भाग कोसळला.

(late actress Nutan's bungalow in Thane collapsed due to heavy rain)

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी सांगितले की,

मुसळधार पावसामुळे नूतनच्या बंगल्याचा काही भाग कोसळला. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. सध्या घटनास्थळी डेब्रिज हटवण्याचे काम सुरू आहे.

यासीन तडवी यांनीही अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पाठवले असून तेथून मलबा हटवण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.

अधिकाऱ्याने सांगितले की, नूतनचा बंगला मुंब्रा येथील घोलाई नगरजवळील टेकडीवर आहे. दिवंगत अभिनेत्री नूतन यांचा हा बंगला रिकामा होता, त्यामुळे या दुर्घटनेत कोणाचाही बळी गेला नाही.

दुसरीकडे, मीडिया रिपोर्ट्सनुसार,नूतन यांचा हा बंगला खूप वादात सापडला आहे. त्यांचा मुलगा मोहनीश बहल हा बंगला पाहण्यासाठी अनेकदा येत असतो.

नूतन यांच्याविषयी थोडंसं..

नूतन बॉलीवूडमधील सर्वात हुशार अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांचा जन्म 1936 मध्ये झाला. नूतनने ‘हमारी बेटी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

दिवंगत अभिनेत्री नूतन यांनी 40 वर्षांच्या कारकिर्दीत 70 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांचे अनेक चित्रपट सुपर-डुपर हिट ठरले आणि त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.1991 ला दिग्गज अभिनेत्री नूतन यांनी अखेरचा श्वास घेतला.

वास्तविक, नूतनचा मृत्यू ब्रेस्ट कॅन्सरमुळे झाला होता. दुसरीकडे, नूतनचा मुलगा मोहनीश बहल यानेही बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलंय.

टीव्हीवरील अनेक शोमध्येही मोहनीश दिसला आहे. नूतन यांचा ठाण्यातील बंगला कायदेशीर कचाट्यात अडकला आणि तो आता पडीक झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope : 12 तारखेपासून सुरू होतोय गजकेसरी राजयोग! वृषभसह 4 राशीचं भाग्य उजळणार; होणार धनलाभ, प्रेमात यश, मोठं स्वप्न होईल पूर्ण

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

SCROLL FOR NEXT