Rakhi Sawant, lawrence bishnoi, salman khan news, rakhi sawant news, rakhi sawant threatens SAKAL
मनोरंजन

Rakhi Sawant: सलमानला सपोर्ट केलास तर... राखी सावंतला बिष्णोई गॅंग कडून धमकी

बिष्णोई गॅंगने राखीला धमकीही दिली आहे.

Devendra Jadhav

Rakhi Sawant News: लॉरेंस बिष्णोई गॅंगने सलमान खानला धमकी दिली हे आपल्या सर्वांना माहीतच आहे.

आता या गॅंगने राखी सावंतला धमकीचे पत्र दिल्याची बातमी उघडकीस आलीय. सलमान खानला सपोर्ट केल्याप्रकरणी राखी सावंतला बिष्णोई गॅंगने धमकी दिली आहे.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने राखीला ईमेल पाठवून सलमानपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.

काहीच दिवसांपूर्वी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही सुपरस्टार सलमान खानला मुंबईत मारणार असल्याचेही लॉरेंस बिष्णोई गॅंगने जाहीर केले होते. आता बिष्णोई गॅंगने राखीला धमकीही दिली आहे.

(lawrence Bishnoi gang bitterly threatens Rakhi Sawant for supporting salman khan)

यासंबंधी राखीशी संपर्क केला असता तिने मीडिया सोबत खुलासा केला की, 'ते म्हणत आहेत की जर तू सलमान खानबद्दल बोललीस तर आम्ही तुला मारून टाकू. पण मी सलमान खानबद्दल बोलेन कारण माझ्या आईची तब्येत खराब असताना त्याने मदत केली होती.

माझ्या आईला कॅन्सरपासून वाचवण्यासाठी भाईजानने 50 लाख रुपये खर्च केले होते. मी का बोलत नये? त्याने सिद्धू मुसेवालावर गोळी झाडली.

लोक नंतर मेणबत्ती मार्च काढतात आणि एखाद्याच्या मृत्यूनंतर रडतात. कोणी जिवंत असताना आपण भूमिका घेऊ नये का?

राखी तिला मिळालेल्या ईमेलवर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही असाही खुलासा तिने केला आहे. ती म्हणाली, 'मी कोणतीही कायदेशीर कारवाई करत नाहीये. मी घाबरले आहे आणि गोंधळलो आहे. याप्रकरणी काय करावे समजत नाही. मी हे सर्व देवावर सोडत आहे.

राखीला प्रिन्स मावी नावाच्या व्यक्तीकडून दोन ईमेल मिळाले. या इमेल मध्ये त्याने आपण गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा आणि गोल्डी ब्रार ग्रुपचा मेम्बर असल्याचा दावा केला होता.

पहिला ईमेल राखीला 18 एप्रिल रोजी सकाळी 7.22 वाजता पाठवण्यात आला होता आणि दुसरा ईमेल 18 एप्रिल रोजी दुपारी 1.19 वाजता आला होता. आता या प्रकरणाला पुढे कोणतं वळण मिळणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT