Leo is coming to Netflix on 24th Nov in India and 28th Nov Globally in Tamil  SAKAL
मनोरंजन

Leo on OTT: थलापती विजयचा सुपरहिट 'लिओ' पाहा आता घरबसल्या! कधी? कुठे? जाणून घ्या एका क्लिकवर

लिओ सिनेमा आता OTT वर रिलीज होणार आहे

Devendra Jadhav

Leo on OTT News: थलापती विजयचा लिओ सिनेमाने बॉक्स ऑफीसवर सुपरहिट कामगिरी केली. लिओ सिनेमा सर्वांना आवडला. लोकेश कनगराजच्या विक्रम युनिव्हर्सचा एक भाग म्हणजे लिओ.

थलापती विजयच्या लिओने प्रेक्षक - समीक्षकांचं मन जिंकलं. आता लिओ ज्यांना सिनेमागृहात पाहता आला नाही, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. लिओ आता घरबसल्या पाहायला मिळणार आहे. कधी? कुठे? जाणून घ्या.

लोकेश कनागराज दिग्दर्शित, 'लिओ' हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर आहे, जो 19 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाने जगभरात 600 कोटींहून अधिक कमाई केली.

20 नोव्हेंबर रोजी, नेटफ्लिक्स इंडिया साउथच्या अधिकृत X हँडलने 'Leo' च्या स्ट्रीमिंग तारखेची घोषणा केली. Leo आता 24 नोव्हेंबर रोजी भारतात आणि 28 नोव्हेंबर रोजी तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत जगभरात नेटफ्लिक्सवर येत आहे.

लिओची सक्सेस पार्टी

1 नोव्हेंबर रोजी नेहरू इनडोअर स्टेडियमवर या चित्रपटाचे यश साजरा करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये थलपती विजयच्या सुमारे 7000 चाहत्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी थलपतीच्या क्रेझी चाहत्यांची गर्दी पहायला मिळाली.

हे फोटो शेयर करत विजयने 'हॅशटॅग लिओ सक्सेस मीट' असे कॅप्शन दिले. यावेळी विजयने कॉटन ब्राऊन शर्ट आणि डेनिम जीन्स घातली होती. या फोटोंमध्ये चाहत्यांची गर्दी पहायला मिळाली. विजयसोबत अभिनेत्री त्रिशा कृष्णा, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेता गौतम वासुदेव मेनन दिसले.

आता लिओ घरबसल्या पाहायला मिळाल्याने थलापती विजयचे फॅन्स नक्कीच खूश झाले असतील यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT