Leo Trailer Thalapathy Vijay Rocks Fans praised esakal
मनोरंजन

Leo Trailer : नाद करा पण 'थलापती'चा कुठं? केजीएफचा रॉकी, जवानच्या विक्रम राठोडनं 'लिओ'चा ट्रेलर पाहून जोडले असते हात!

थलापती विजयच्या लिओचा ट्रेलर अखेर चाहत्यांच्या भेटीला आला आहे.

युगंधर ताजणे

Leo Trailer Thalapathy Vijay Rocks Fans praised : दाक्षिणात्य चित्रपट विश्वामध्ये आपल्या अभिनयाची वेगळीच छाप उमटविणाऱ्या अभिनेत्यांमध्ये थलापती विजयचे नाव घ्यावे लागेल. गेल्या काही वर्षांपासून त्याच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना वेडं केलं आहे. आता त्याच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा लिओ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

मास्टर, वारिसू, बिस्ट सारख्या चित्रपटांमधून विजयनं त्याची वेगळी ओळख प्रेक्षकांसमोर ठेवली होती. त्यात लिओच्या ट्रेलरनं ती पुन्हा एकदा अनोख्या प्रकारे अधोरेखित झाली आहे. साऊथमध्ये एखाद्या अभिनेत्याचा चित्रपट प्रदर्शित होणे किंवा त्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणे हे एखाद्या उत्सवाप्रमाणे असते. अशावेळी त्याला मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून येते.

Also Read - Penny Stocks : जादा नफ्याच्या मृगजळामागं धावणं नकोच!

सोशल मीडियावर विजयच्या चाहत्यांनी लिओविषयी ज्या पोस्ट केल्या आहेत त्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अनेकांनी त्यावर दिलेल्या प्रतिक्रिया भलत्याच भन्नाट आहे. यापूर्वी विजयच्या लिओचा जेव्हा टीझर समोर आला होता त्यामुळे त्याच्या ट्रेलरची प्रेक्षकांना आणि त्याच्या चाहत्यांना कमालीची उत्सुकता होती.

तमिळ चित्रपट विश्वामध्ये थलापती विजयच्या नावाची मोठी क्रेझ आहे. त्यानं गेल्या काही वर्षांपासून ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केल्याचेही दिसून आले आहे. लोकेश कनगराजनं दिग्दर्शित केलेला लिओ हा चित्रपट यावर्षीचा विजयचा सर्वाधिक उत्सुकता असलेला प्रोजेक्ट आहे. १९ ऑक्टोबर रोजी तो प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये संजय दत्त, त्रिशा, अर्जून सर्जा यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

विजयचा लिओ हा पॅन इंडिया प्रोजेक्ट असल्याचे सांगण्यात आले आहे. आज त्याचा तमिळ, हिंदी, कन्नड भाषांमधील चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याला मिळालेला प्रतिसादही जोरदार असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी या चित्रपटाचे स्टंट अॅक्शन डिरेक्टर थावशी राज यांनी म्हटले होते की, विजयचा हा आतापर्यतचा सर्वाधिक चर्चेतील चित्रपट आहे. त्यात त्यानं केलेली मेहनत निश्चितच कौतुकास्पद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT