Liger Movie news  esakal
मनोरंजन

Liger : माईक टायसनचा एकच ठोसा, विजयला दिसले तारे! 'अजुनही...'

जगप्रसिद्ध बॉक्सर माईक टायसनसोबत काम करणं किती आव्हानात्मक होतं हे त्यानं सांगितलं आहे.

युगंधर ताजणे

Liger Movie: बॉलीवूडला आव्हान देण्यासाठी आता वेगवेगळ्या विषयांवरील टॉलीवूडचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यात प्रसिद्ध अभिनेता विजय (Tollywood Actor Vijay Deverakonda) देवरकोंडा, अनन्या पांडेचा लायगर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याचे सध्या जोरदार प्रमोशनही सुरु झाले आहे. त्याच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. चित्रपटाच्या (Bollywood Actress Ananya Padey) नावावरुनच चर्चेला सुरुवात झाली होती. लायगरची भूमिका विजयनं पार पाडली असून त्यानं या चित्रपटामध्ये माईक टायसनसोबत काम केल्याचा अनुभव एका मुलाखतीतून चाहत्यांना सांगितला आहे. तो ऐकून त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. जगप्रसिद्ध बॉक्सर माईक टायसनसोबत काम करणं किती आव्हानात्मक होतं हे त्यानं सांगितलं आहे.

लायगरकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. त्यात प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती माईक टायसनच्या भूमिकेची. त्यात त्यानं कॅमिओ केला आहे. विजयनं एका मुलाखतीमध्ये आपला जेव्हा माईक टायसनसोबत सामना झाला तेव्हा त्याच्या एकाच ठोशानं आपल्याला गारद केल्याचे त्यानं सांगितले. मला मायग्रेनचा त्रास सुरु झाला. जेव्हा तुम्ही जगप्रसिद्ध बॉक्सरशी दोन हात करता तेव्हा आणखी काय होणार याची प्रचिती मला त्यावेळी आली. तो अनुभव आठवला की मला अजुनही अंगावर काटा उभा राहतो. माईक यांचं व्यक्तिमत्व, देहबोली आणि त्यांचा आक्रमकपणा हे सारं जबरदस्त असल्याचे मला जाणवले.

माईक यांच्या एका पंचनं माझी तब्येत बिघडली होती. माईक हा 1986 मध्येच बॉक्सिंग विश्वात मोठमोठे विक्रम करणारा खेळाडू आहे. तो त्याच्या आक्रमक स्वभावाबद्दलही ओळखला जातो. अशा माईकसोबत जेव्हा विजयनं चित्रपटाच्या निमित्तानं पंगा घेतला तेव्हा मात्र त्याची डोकेदुखी चांगलीच वाढल्याचे दिसून आले. पुढील काही दिवस त्याला शुटींग करताना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागल्याचे दिसून आले. विजयनं लायगरच्या प्रमोशनच्या वेळी ही गोष्ट सांगून चाहत्यांना मोठा धक्काच दिला आहे. 25 ऑगस्टला त्याचा बहुचर्चित असा लायगर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लायगर फेम विजयनं बॉलीवूड लाईफला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या आणि माईकच्या फाईटचा उल्लेख केला. जो आता सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनन्यानं देखील एक मजेदार गोष्ट यावेळी सांगितली. ती म्हणाली माईक यांनी जेव्हा माझ्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा तर मी पडता पडता वाचले. आम्ही माईक यांना फार घाबरुन होतो. पण ते खूप प्रेमळ आहेत. लायगरच्या निमित्तानं तर आम्ही चांगले मित्र झालो आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT