Liger Song Waat Laga Denge Out: प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडेचा चित्रपट 'लायगर' मागल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झालाय. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या चित्रपटाचं दुसरं गाणं प्रदर्शित झालंय. 'वाट लगा देंगे' या गाण्यामध्ये विजय देवरकोंडा (Vijay Deverkonda news) बॉक्सिंग रिंगणात संपू्र्ण जोशात दिसतोय. विशेष म्हणजे हे गाणं विजय देवरकोंडाने गायलं आहे त्यामुळे हे गाणं प्रेक्षकांत भलताच जोश निर्माण करणारं ठरतंय. या गाण्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे.
अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावर या गाण्याच्या रिलीजची माहिती चाहत्यांना दिली होती. 'सोनी म्युझिक इंडिया' च्या युट्यूब चॅनलवर हे गाणं रिलीज होताच तासाभऱ्यात चाहत्यांचा कमेंट्सचा वर्षाव या गाण्यावर झालाय.चाहत्यांकडून लायगरच्या दुसऱ्या गाण्यालाही चांगला प्रतिसाद मिळतोय. या गाण्यात अभिनेता विजय भलत्याच जोशात दिसतोय. त्याचा हा जोश बघून प्रेक्षकही हे गाणं बघण्यात उत्सुकता दाखवताय.
विजय देवरकोंडा नेहमीच त्याचा हटके अंदाज प्रेक्षकांना दाखवत असतो. आम्हाला खात्री आहे या चित्रपटातून विजय प्रेक्षकांसाठी भरपूर मनोरंजन घेऊन येणार आहे. असं या गाण्यावर कमेंट करत चाहत्याने अभिनेत्याचा उत्साह वाढवलेला दिसतो. तर अनेकांनी हे गाणं लिहिणाऱ्या पुरी जगन्नाथांचेही यावेळी कौतुक केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.