Liger Trailer: South Fans Pour Milk On vijay Deverakonda cut Out Posters Video Goes Viral On Social Media Esakal
मनोरंजन

Liger: विजय देवरकोंडाच्या ७५ फूट उंच कट आऊट्सला दुधाची आंघोळ,Video Viral

विजय देवरकोंडाचा बहुप्रतिक्षित सिनेमा लाइगरचा ट्रेलर २१ जुलै रोजी लॉंच करण्यात आल्यानंतर अभिनेत्याच्या चाहत्यांमध्ये उत्सवाचं वातावरण पहायला मिळत आहे.

प्रणाली मोरे

एका काळी जे 'थलाइवा' रजनीकांतसाठी पहायला मिळत होतं,ते आता चाहत्यांनी विजय देवरकोंडासाठी केल्याचं पहायला मिळालं. लोक रजनीकांतचा सिनेमा रिलीज झाल्यावर त्याच्या उंच कट आऊट्सला पुष्पहार घालून दुधाची आंघोळ घालायचे. काहीसं असंच आता तेलुगु अभिनेता विजय देवरकोंडा(Vijay Deverakonda) सोबत घडलेलं पहायला मिळालं. विजय देवरकोंडाचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'लाइगर'चा ट्रेलर २१ जुलै रोजी लॉंच करण्यात आला. या ट्रेलर लॉंचचे निमित्त साधून चाहत्यांनी विजय देवरकोंडाच्या ७५ फूट उंच कट आऊट्स उभारला ,आणि इथवर न थांबता त्यांनी चक्क त्या कट आऊट्सला दुधाची आंघोळही घातली.(Liger Trailer: South Fans Pour Milk On vijay Deverakonda cut Out Posters Video Goes Viral On Social Media)

गेल्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये जेव्हा 'लाइगर' सिनेमाचा पोस्टर रिलीज करण्यात आला होता तेव्हा देखील चाहत्यांनी त्याला दुधाची आंघोळ घातली होती,त्याची आरतीही केली होती. चाहत्यांनी तेव्हा विजय देवरकोंडासाठीच्या आपल्या प्रेमाची हद्दच पार केली होती. आता लाइगरच्या ट्रेलर लॉंचच्या निमित्ताने हैदराबादच्या एका थिएटर बाहेर चाहत्यांनी विजय देवरकोंडाचा ७५ फूट उंच कट आऊट उभारला आहे. या कटआऊट मध्ये विजय देवरकोंडा भारताच्या तिरंग्याला उंचावताना दिसत आहे. अभिनेत्याचा हा कटआऊट लाइगरच्या एका सीनच्या आधारावर बनवला आहे. या सिनेमात विजय देवरकोंडा एमए किक बॉक्सरच्या भूमिकेत आहे.

'लाइगर' सिनेमा २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. पुरी जगन्नाथच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या सिनेमातून विजय देवरकोंडा बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. तर अनन्या पांडे या सिनेमाच्या माध्यमातून तेलुगु सिनेमात पदार्पण करतेय. लाइगर सिनेमात बाहुबली सिनेमातील शिवगामी म्हणजेच राम्या कृष्णन देखील आहे. विजय देवरकोंडाच्या या ७५ फूटी उंच कट आऊट्सला चाहत्यांनी पुष्पहार तर घातलेच पण दुधानं देखील आंघोळ घातली.

दाक्षिणात्य सिने इंडस्ट्रीत अभिनेत्यासाठी चाहत्यांचे प्रेम एका वेगळ्या लेवलवर पहायला मिळते. कधी चाहते आपल्या स्टार्सच्या कट आऊट्सला दुधाची आंघोळ घालतील तर कधी त्यांच्या नावाचं मंदीर किंवा मूर्तीही बनवतील,याचा काहीच नेम नसतो. साऊथच्या चाहत्यांनी अभिनेत्री खुशबू सुंदरचे देखील मंदीर बनवले होते. २०१९ मध्ये अभिनेता सूर्याचा Nandha Gopalan Kumaran या त्याच्या सिनेमाला भरघोस यश मिळाल्यानंतर चाहत्यांनी २१५ फूटी कट आऊट्स बनवला होता. २०१७ मध्ये मद्रास हाय कोर्टाने खरंतर असे उंच कट आऊट्स बनवण्यावर बंदी आणली होती. पण तरी देखील केजीएफ च्या रॉकी भाईचा म्हणजेच अभिनेता यशचा देखील उंच कट आऊट्स उभारला गेला होता.

२०१७ मध्ये महेश बाबूच्या चाहत्यांनी त्याचा ९० फूट उंच कट आऊट्स लावल्यानंतर पोलिसांनी आक्षेप घेतला होता. तेव्हा बोललं जात होतं की त्याच्या एका चाहत्याने पोलिसांच्या आक्षेपानंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT