Anjali Arora ,Kaaranvir Bohra(Lockup Contestants) Google
मनोरंजन

Lockupp: मॅरिड करणवीरला अंजलीशी करायचंय अफेअर;म्हणाला,'प्रेम कर तरच..'

'लॉकअप'च्या नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात अंजली अरोरानं एक खळबळजनक दावा केला आहे.

प्रणाली मोरे

कंगना रनौत(Kangana Ranaut)च्या 'लॉकअप'(Lockupp) या रिअॅलिटी शो मध्ये अत्याचारी खेळाला चांगलीच सुरुवात झाली आहे. या शोच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात एक मोठा धमाका झाला आहे. शो मधील सदस्य अंजली अरोरानं एक खळबळजनक आरोप केला आहे. अंजलीनं तिच्या आरोपात म्हटलं आहे की,''रिअॅलिटी शो मध्ये टिकण्यासाठी त्यामध्ये भाग घेतलेले स्पर्धक प्रेमाचं खोटं नाटक रंगवतात. त्यांना वाटतं शो मध्ये प्रेमाचा खोटं नाटक खेळलो की आपण जास्त दिवस टिकून राहू''.

'लॉकअप'च्या नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंजली अरोरा(Anjali Arora) मुन्नवरला सांगतेय की,''करणवीर(Karanvir) आपल्या पत्नीचा फोटो घेऊन माझ्याकडे आला आणि म्हणाला,'या खेळात मी आणि या फोटोतली ही तू आहेस'. मला सुरुवातीला काही कळालं नाही. मुन्नवरनं तिला पुढं काय झालं विचारलं तेव्हा ती म्हणाली,करण मला त्याच्या सोबत प्रेमाचं खोटं नातं जोडण्यास सांगत होता''. तेव्हा मुनव्वर अंजलीला म्हणाला,''मी या जेलमधील सगळयांनाच चांगलं ओळखलं आहे. करणवीर दोन्ही पक्षांशी चांगलं वागायचा प्रयत्न करुन चालाख बनतोय''. पुढे अंजलीला करण काय बोलला हे सांगताना ती म्हणाली,''करण या शो ला रिअॅलिटी शो समजतच नाही. तर २४X७ मी कामावर आहे,आणि ही नोकरी करताना मला माझे डोळे-कान उघडे ठेवायचेत,आणि सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायचाय. असं केलं की खेळ माझ्याही नकळत खेळला जाईल''.

हे ऐकून मुनव्वर मात्र शॉक झाला आणि म्हणाला,''तू हे खरं बोलतेयस? हा निव्वळ मूर्खपणा आहे''. पण त्यावर अंजली म्हणाली,''करण म्हणाला हेच विकलं जातं. माझं वय झालंय पण तू तरुण आहेस,आणि जर तुला मी आवडू लागलो तर लोकांनाही ते पाहणं आवडेल. तुला लोकांना दाखवावं लागेल की तु माझ्या प्रेमात पूर्णपणे बुडाली आहेस''. तेव्हा अंजलीनं हे सगळं इतके दिवस का लपवलं,की त्यानं जे सांगितलं तसं वागायचा विचार करत होती का? असा प्रश्न मुन्नवरनं केला. त्यानं अंजलीची यावरनं मस्करी देखील केली. अंजलीनं मुनव्वरला हे कुणाला सांगू नकोस असं देखील बजावून सांगितलं. पण आता यावर कंगना रनौत काय स्टॅंड घेतेय,अंजली खरं बोलतेय का,करणचा क्लास कंगना कसा घेईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: शस्त्रसंधी झाली पण होर्मुझ बंदच! पुन्हा युद्ध सुरु होण्याचा धोका; विशेष परवानगी घेण्याचे जहाजांना मेसेज, नाहीतर...

Mulshi Bhalgudi fire: मुळशी तालुक्यातील भालगुडी लव्हाळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; सुदैवाने जीवितहानी टळली

Pune suspected rabies dog bite: म्हात्रे पूल परिसरात संशयित रेबिजग्रस्त श्वानाचा पाच जणांना चावा; महापालिकेच्या तत्परतेने अनर्थ टळला

Pune Municipal Corporation News: नगरसेवकांना खासगी सोसायट्यांमध्ये ‘स’ यादीतून कामे करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव; पुणे शहर सुधारणा समितीसमोर मागणी

Pune Overhead Cable Policy: ओव्हरहेड केबल गोंधळावर तोडगा; पुणे महापालिकेकडून भूमिगत केबलला प्राधान्य देत नवे धोरण, समिती स्थापन

SCROLL FOR NEXT