Poonam Pandey with ex-husband Sam Bombay Google
मनोरंजन

'कुत्र्यासोबत झोपल्यावर तो मारायचा';पूनम पांड्येचा नवऱ्याविषयी खुलासा

कंगना रनौतच्या 'लॉकअप' या शो मध्ये पूनमने वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या.

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेत्री पूनम पांड्ये(Poonam pandey) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात पडते आणि त्याची चर्चा होते. अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अर्थात पूनमने आपल्या या वादग्रस्त वैयक्तिक आयुष्याविषयी अनेकदा खुलासे केले आहेत. गेल्याच वर्षी तिनं आपला नवरा सॅम बॉम्बेवर तिला मारहाण केल्याचा आरोप केला होता. आता पुन्हा पूनमनं सॅमविषयी एक मोठा खुलासा केला आहे. तिनं म्हटलं आहे,''त्याच्या अत्याचारांमुळे माझं ब्रेन हॅमरेज झालं होतं''.

पूनम पांड्ये सध्या कंगना रनौत(Kangana Ranaut)च्या 'लॉकअप'(Lockup) या रिअॅलिटी शो मध्ये आपल्याला दिसत आहे. याच शो मध्ये तिनं आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी काही खुलासे केले आहेत. 'लॉकअप' मध्ये करणवीर वोहरानं पूनम पांड्येला विचारलं की,''तिचं खरंच सॅम बॉम्बेवर प्रेम होतं?'' यावर पूनम पांड्येनं जो खुलासा केला तो ऐकून सारेच हैराण होतील हे नक्की. तिनं सांगितलं की,''एकदा सॅमनं तिला इतकं मारलं होतं की तिचं ब्रेन हॅमरेज झालं होतं''. पूनम पांड्ये पुढे म्हणाली की,''तो त्याला वाटेल तसं मला वागवायचा. मला स्वतःसाठी वेळच द्यायचा नाही. गुलाम बनवून ठेवलं होतं मला. मला साधं घराच्या गच्चीत किंवा गॅलरीतही तो उभं राहू द्यायचा नाही. माझा फोन सोबत ठेवायला परवानगी नव्हती. माझ्या घरातही माझा फोन मला हातात मिळायचा नाही. मला वाटायचं तो माझ्याविषयी खूप पझेसिव्ह आहे म्हणून असेल कदाचित. मी ही ठरवलं की मी त्याला हवं तसं राहीन,त्याला वेळ देईन''.

''पण सॅम इतका विचित्र होता की साधं माझ्या कुत्र्याला मी प्रेम दिलं,त्याच्यासोबत झोपले तरी तो माझ्यावर शंका घ्यायचा. म्हणायचा,त्याच्यापेक्षा मी माझ्या कुत्र्यावर प्रेम करते. हे माझ्यासोबत अनेकदा व्हायचं. मार तर रोज ठरलेला''. त्यावर जेव्हा करणने विचारलं की, 'तुला यातून बाहेर यायला किती वेळ लागला?' तेव्हा पूनम म्हणाली,''मी खूप दिवसांपासून यातून बाहेर यायचा प्रयत्न करीत आहे. माझ्यासोबत हे गेल्या चार वर्षांपासून होत होतं. तो मला एकाच ठिकाणी सतत मारायचा. त्यामुळे माझ्या काही जखमा या कायमच्या अंगावर राहून गेल्या. मी मेकअप करून माझ्या जखमा लपवायची. सगळ्यांसमोर ते सगळं लपवण्यासाठी मी उत्तम अभिनय करायची''.

तेव्हा पायल रोहातगीनं पूनमला सॅमच्या मारण्याचं कारण विचारलं . ती म्हणाली,''जो माणूस सकाळी १० वाजल्यापासून दारू प्यायला सुरुवात करतो ते थेट रात्रीपर्यंत त्याचं पिणं सुरू असतं,तो आणखी काय करणार बायकोसोबत. मला कुणी त्यावेळी वाचवायला यायचं नाही. घरातला काम करणारा स्टाफही घाबरायचा''. याव्यतिरिक्त पूनम पांड्येनं आपल्या आयुष्याविषयी आणखीही अनेक गोष्टींचा खुलासा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tanaji Sawant Audio Clip: ''कोट-दोन कोट जाऊ द्या... व्हॉट्सअ‍ॅपला यादी टाका'', तानाजी सावंतांनी मतदानासाठी पैसे वाटले? क्लिप व्हायरल

ZP Elections 2026 Voting Live Update : भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी बजावला मतदानाचा हक्क

Bhiwandi Mayor: भिवंडीत भाजपमध्ये दुफळी! महापौरपदासाठी नारायण चौधरी यांची घोषणा; पण बॅनरबाजीवर चित्र वेगळंच

DEVKHEL REVIEW: १५ वर्षांची प्रथा, शंकासुराची शिक्षा अन् मृत्यूचं गूढ; कशी आहे अंकुश चौधरी प्राजक्ता माळीची 'देवखेळ' सीरिज

Pak vs Ned T20 World Cup : नेदरलँड्सने दिले कडवे आव्हान, पाकिस्तानला विजयासाठी घाम फुटला; कोलंबोच्या मैदानावर रोमांच रंगला

SCROLL FOR NEXT