Sangram Singh ,Payal Rohatgi Google
मनोरंजन

पायल-संग्रामच्या नात्याचा Black Magic मुळे होणार होता The End?

'काम मिळण्यासाठी मी वशीकरण पूजा करायची' याचा खुलासा स्वतः पायल रोहातगीनं Lockup शो दरम्यान केला होता.

प्रणाली मोरे

कंगनाच्या(Kangana Ranaut) 'लॉकअप'(Lockup)ध्ये सध्या बंदिस्त असलेली पायल रोहातगी(Payal Rohatgi) अनेक कारणांमुळे सध्या चर्चेत आहे. कधी 'लॉकअप' मध्ये इतर कैद्यांशी होणारे वाद असोत की तिनं स्वतः केलेलं एखादं खळबळजनक भाष्य असो आजकाल तिची चर्चा मात्र चांगलीच रंगताना दिसतेय. पायल लवकरच तिचा बॉयफ्रेंड संग्राम सिंग(Sangram SIngh) याच्याशी लग्न करणार आहे. जुलै मध्ये ते लग्न करणार असल्याची माहिती संग्रामनेच दिली. संग्राम मोटिवेशनल स्पीकर असण्यासोबतच भारतीय कुस्तीपट्टू म्हणूनही ओळखला जातो. पायल आणि संग्राम गेली १२ वर्ष नात्यात आहेत,एकत्र राहत होते. आता मात्र त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. पण हा निर्णय घेताना पायलनं खूप विचार केला,चर्चा केली तसंच इथवर नं थांबता तिनं मांत्रिकाचा देखील सल्ला घेतला होता असं भाष्य संग्रामनं केल्यानं पायल पुन्हा चर्चेत आली. काय आहे नेमकं प्रकरण? चला जाणून घेऊया.

'लॉकअप' मधील एका टास्क दरम्यान अभिनेत्री पायल रोहातगीनं कबूल केलं की तिनं करिअरला गती मिळावी यासाठी वशिकरण पूजा केली होती. यानंतर सगळीकडेच तिचा बोलबाला झाला होता. पण आता चक्क तिच्या होणाऱ्या नवऱ्याने सांगितलं की आमच्या नात्याला पुढे न्यावं की नाही,लग्न करावं की नाही यासाठी देखील पायल मांत्रिकाकडे गेली होती. तेव्हा त्या मांत्रिकानं सरळ पायलला सांगितलं होतं की हा मुलगा तुझ्यासाठी योग्य नाही,नातं संपवून टाक. पायलला त्या भुरट्या मांत्रिकाकडे तिचे एक नातेवाईक घेऊन गेले होते. त्यांनी पायलला विश्वास दिला होता की जर ती वशिकरण पूजा करेल तर तिच्या आयुष्यात सगळं चांगभलं होईल. फक्त त्या मांत्रिकाला प्रॉडक्शन हाऊसचं नाव द्यायचं. असं केल्यावर तिथनं कॉल यायला सुरुवात होईल. त्याच मांत्रिकानं माझ्याविषयीही तिला चुकीचा सल्ला दिला होता. तो म्हणाला होता,''ही व्यक्ती जोडीदार म्हणून तुझ्यासाठी योग्य नाही. जेव्हा माझं एकदा त्या मांत्रिकाशी बोलणं झालं तेव्हा मी त्याला थेट विचारलं होतं,तुला तुझं भविष्य माहित नाही,तु दुसऱ्यांचे भविष्य काय सांगत फिरतोयस. मी तिथेच तो तांत्रिकाचा विषय पायलला बंद करायला लावला''.

संग्राम पुढे म्हणाला,''पायलला देखील अशा अंधश्रद्धेच्या गोष्टी मान्य नाहीत,पटत नाहीत. तिला स्वतःवर विश्वास आहे,अंधश्रद्धेवर नाही. पण एकदा नातेवाईकांच्या सल्ल्याला ती बळी पडली,तिला वाटलं तो सल्ला तिच्यासाठी योग्य आहे,पण वेळीच तिनं स्वतःला त्यातनं बाहेर देखील काढलं''. पायलनं लॉकअप शो च्या एका टास्क दरम्यान ती वशीकरण पूजा करायची हे मान्य केलं होतं. ती काम मिळण्यासाठी ही पूजा करायची असं ती म्हणाली होती. तिनं हे वक्तव्य केल्यानंतर त्याची उलट-सुलट चर्चा रंगली होती. पण आता तिचा होणारा नवरा संग्रामनं हे सारं पायलनं चुकीच्या सल्ल्यातून केलं होतं,पण यातनं तिनं स्वतःला बाहेर काढले आहे असं सांगून पायलच्या त्या चर्चित प्रकरणाला फुलस्टॉप लावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान आशिया कप लढत! रेकॉर्ड्स, स्टॅट्स आणि संभाव्य विजेता कोण?

मोठी बातमी! विभक्त रेशनकार्डधारक सूना ‘लाडकी बहीण’साठी पात्र; पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, पण ४ लाखांवर लाभार्थी पत्त्यावर सापडल्याच नाहीत

आजचे राशिभविष्य - 14 सप्टेंबर 2025

साप्ताहिक राशिभविष्य : (१४ सप्टेंबर २०२५ ते १९ सप्टेंबर २०२५)

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT