Lock Upp: Tejasswi Prakash to Join Karan Kundrra as Jail Warden?  Instagram
मनोरंजन

Lockupp: नवी वॉर्डन तेजस्वी प्रकाश; 'फाटक्या' पण हटके ड्रेसमध्ये दिसली हॉट

कंगनाच्या लॉकअप मध्ये तेजस्वी प्रकाशनं केलेल्या एन्ट्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

प्रणाली मोरे

टी.व्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश(Tejasswi Prakash) नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. बिग बॉस 15 (Big Boss15) विनर बनल्यानंतर तर आणखीनंच लाइमलाइटमध्ये आली. तेजस्वी प्रकाश आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळते. तिचे फोटौ आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतात. तेजस्वीचा क्यूटनेस चाहत्यांना भलताच आवडतो. तिची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर झालेले देखील आपण पाहतो. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. जो पाहिल्यानंतर तिचे चाहते मात्र भलतेच खूश झाले आहेत.

तेजस्वी प्रकाशनं या व्हिडीओत युनिक ड्रेस घातला आहे. या व्हिडीओत तिला ब्लॅक अॅन्ड व्हाइट ड्रेसमध्ये आपण पाहू शकतो. बर या शॉर्ट ड्रेसला खाली काळ्या रंगाच्या पट्ट्या लावून एक वेगळा लूक दिला गेलाय. ड्रेसला मॅचिंग असे सिल्व्हर कलरचे कानातले देखील तिनं घातले आहेत. कम्प्लीट हेवी मेकअप आणि न्यू हेअरस्टाइल सोबत तिचा लूक एकदम हटके दिसत आहे. तिनं या ड्रेसवर काळ्या रंगाचे शूजही घातले आहेत. यामुळे ती एकदम वेगळी दिसत आहे. या व्हिडीओत तेजस्वी प्रकाश आपल्या शूटसाठी निघालेली दिसत आहे,अर्थातच लॉकअपमध्ये(Lockupp).

हा व्हिडीओ आहे 'लॉकअप'च्या नवीन प्रोमोचा. प्रोमोच्या माध्यमातून खुलासा करण्यात आला आहे की लॉकअप ची वॉर्डन कोणी दुसरी नाही तर ती तेजस्वी प्रकाश आहे. या शो मध्ये तेजस्वी आल्यामुळे आता नवा ट्वीस्ट पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असणार. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतोय की तेजस्वी प्रकाश स्टायलिश अंदाजात ल़ॉकअप मध्ये एन्ट्री घेतेय.

आता हे तर पक्क ठरलंय की तेजस्वीच्या या जबरदस्त एन्ट्रीनंतर शो मधून कुणाचंतरी एलिमिनेशन नक्कीच होणार आहे. या व्हिडीओवर तेजस्वीचे अनेक चाहते लाइक्स आणि कमेंट्स करीत आहेत. अर्थात तेजस्वीवर कौतूकाचा वर्षाव होत आहे तो वेगळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

४ नेत्यांची सेम स्क्रीप्ट! दुसऱ्या पक्षातून भाजपात आले, ६ वर्ष वेटिंगनंतर थेट मुख्यमंत्री

Pune Crime: मॅट्रिमोनी साईटवरची ओळख महागात पडली! पुण्यात महिलेला "मिकी माउस" च्या नोटा देऊन २१ लाखांना गंडा

राकेश आणि तेजश्री प्रधानच्या लग्नाची रंगलेली चर्चा, तारीख सुद्धा काढलेली, राकेश बापट म्हणाला...'बिग बॉसच्या घरात असताना बाहेर...'

NEET परिक्षार्थींना मोठा दिलासा! परीक्षा पुन्हा होणार; विद्यार्थ्यांना सरकारकडून फी माफ

Yedshi Tiger: येडशीतील वाघ बारामतीकडे?; मादी वाघिणीच्या शोधात १०० किमी प्रवासाचा वन विभागाचा अंदाज, वन विभागाचा ‘मेटिंग ट्रॅक’चा अंदाज..

SCROLL FOR NEXT