Lock Upp OTT Show. Google
मनोरंजन

Lock Upp: जिशान खाननं आझमा फलाहला झाडूनं मारलं; कंगनानं घेतला मोठा निर्णय

जिशानच्या या हिंसक वागणुकीवर कंगानानं थेट सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूड क्वीन कंगना रनौत (Kngana Ranaut) होस्ट करत असलेला 'लॉकअप' रीअॅलिटी शो सध्या भलताच चर्चेत आहे. या शो मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये राग,वाद,भांडणं दिवसेंदिवस वाढताना आणि विकृत रुप घेताना दिसत आहेत. आता तर 'लॉकअप' मध्ये असं काही झालंय की ज्याची कल्पना खुद्द कंगनाला देखील नव्हती. शो मध्ये आठवड्याच्या सुरुवातीला जिथे जिशान खान(Zeeshan Khan) आणि आजमा फलाह(Azma Fallah) दरम्यानं वाद-विवाद पहायला मिळाले. हे भांडण इतकं वाढलं की जीशानने चक्क आझमावर हात उचलला. जिशानच्या या हिंसक वागणुकीवर कंगनानं थेट सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. चला जाणून घेऊया काय घडलं होतं नेमकं.

Kangana Ranaut Insta story-post image

'लॉकअप' च्या सध्याच्या भागात दाखवलं गेलं की जिशान खान आणि आझमा फलाह दरम्यान जोराचं भांडणं झालं. आणि यामध्ये आझमाने जिशानची गर्लफ्रेंड रिहाना पंडितचं नाव मध्ये गोवलं आणि रागात तिला उलट-सुलट बोलायला लागली. जिशान तेव्हा आझमाला असं बोलू नकोस हे सारंख बजावत होता. तो म्हणत होता की,''रिहानाला आपल्या भांडणात मध्ये ओढू नकोस''. पण आझमा ऐकायला तयारच नव्हती. गोष्ट इतकी टोकाला पोहोचली की,आझमा सांगितलेलं ऐकत नाही हे पाहून जिशानला इतका तिचा राग आला की त्यानं तिचं सारं सामान फेकायला सुरुवात केली. आझमाचं मेकअपचं सामान,तिची औषधं सगळं त्यानं अस्ताव्यस्त फेकून दिलं. आणि आवेगात तिच्याकडे पहात म्हणाला,''हिला कुणीतरी सांगा शांत बसं. नाहीतर हिचं तोंड पकडून जबड्याला तोंडापासून वेगळं करेन आणि तुकडे-तुकडे करुन देईन''. इतकंचं नाही तर जिशान आझमाला मारण्याच्या हेतूने तिच्या अंगावर धावूनही गेला,पण त्याला घरातल्या साऱ्यांनी येऊन थांबवले. तेवढ्यात जिशाननं आझमाच्या हातून झाडू खेचली अन् ती तिच्या चेहऱ्यावर फेकून मारली. तेव्हा पायल रोहातगीनं मध्यस्थी केल्यावर तिला देखील जिशाननं ढकलून दिलं. आतापर्यंत शो मध्ये झालेल्या भांडणात हे सर्वात मोठं भांडण असल्याचं बोललं जात आहे.

होस्ट कंगना रनौत आणि करण कुंद्रा दोघांनी या घटनेविरोधात प्रतिक्रिया नोंदवली आहे. कंगनानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत एक पोस्ट शेअर करत त्या माध्यमातून जिशान खानच्या वागण्यावर राग व्यक्त केला आहे. कंगनानं लिहिलं आहे,''मी लॉकअप मध्ये जिशान खान आणि आझमा फलाह मध्ये झालेल्या टोकाच्या वादाला पाहिलं आणि महिलांच्या विरोधात हिंसा मी कदापी सहन करणार नाही''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT