Mandana Karimi, Gautam Gupta Google
मनोरंजन

LockUpp- 'मंदानाचं खरं रुप कळलं तर हैराण व्हाल'; अखेर दीरानं केली पोलखोल

मंदाना करिमीनं 'लॉकअप' शो च्या एका भागात आपला पूर्वाश्रमीचा नवरा आणि त्याच्या कुटुंबियांवर कौटुंबिक अत्याचाराचे आरोप केले होते.

प्रणाली मोरे

कंगनाच्या(Kangana Ranaut) 'लॉकअप'(Lockupp) मध्ये बंदिस्त असलेली मंदाना करिमी(Manadna Karimi) प्रत्येक एपिसोडमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोठे खुलासा करताना दिसत आहे. तिचे स्फोटक खुलासे ऐकून प्रेक्षकही डोक्याला हात लावत आहेत. एकीकडे तिनं आपला पूर्वाश्रमीचा नवरा गौरव गुप्तावर कितीतरी गंभीर आरोप केले आहेत तर दुसरीकडे शो मधील एलिमिनेशनपासून वाचण्यासाठी तिनं एकं मोठं सीक्रेट ओपन केलंय. एका दिग्दर्शकासोबत आपलं रिलेशन होतं.आणि यातून आपण गर्भवती देखील राहिले होतो. पण आता मंदाना करिमीनं तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीवर जे गंभीर आरोप लावले होते त्यांना खोटं ठरवत तिचा दीर गौतम गुप्तानं(Gautam Gupta) पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मंदाना करिमीच्या आरोपांचं खंडन करताना पहिली प्रतिक्रिया देणाऱ्या गौतम गुप्तानं म्हटलं आहे,'' मंदाना लग्नानंतर गौरवसोबत कशी वागली आहे हे सांगून आम्हाला आमच्या कुटुंबाची इज्जत चव्हाट्यावर आणायची नाही. जर लोकं तुमच्यावर नको ते घाणेरडे आरोप करतायत,गलिच्छ भाषा तुमच्याविरोधात वापरत आहेत तर आपण त्यावर रिअॅक्टच का व्हायचं?'' जेव्हा गौतमला विचारलं गेलं की गौरवने मंदानासोबत लग्न केल्यावर तुमच्या कुटुंबाने तिला स्विकारलं होतं का? तेव्हा तो म्हणाला,''चुका होतात,लोकं फसू शकतात. पण देवाची कृपा आहे की काही मोठं घडण्याआधी सगळं संपलं''.

मंदानाचा दीर गौतम इथेच शांत बसला नाही तर मंदानाने त्याचा भाऊ गौरववर जे आरोप लावले त्याला 'बकवास' म्हटलं आहे. आणि स्पष्ट केलंय की,''गौरवला आता मंदाना तिच्या आयुष्यात काय करतेय याच्याशी काही घेणं-देण नाही''. मंदानानं सांगितलं होतं की,तिचं आजही गौरववर प्रेम आहे. ज्यावर गौतमनं म्हटलंय,''तुम्ही जर हिच्याविषयी खरं काय ऐकाल तर हैराण व्हाल, ही खूप वाईट प्रवृत्तीची होती''. दिग्दर्शकासोबत आपलं अफेअर होतं,आपण गर्भवती होतो असं मंदानानं जे सांगितलं होतं त्यावर तिचा दीर गौतम म्हणाला,''ती मुर्ख आहे. असं बोलल्यानं तिलाच पुढे जाऊन त्रास होणार आहे आयुष्यात. लोक हसतील तिच्यावर. कोणत्याही शो मध्ये इतका घाणेरडा गेम कोणताही कंटेस्टंट खेळला नसेल. आमच्यासाठी मंदाना आता महत्त्वाची नाही''.

मंदाना करिमीनं २०१७ मध्ये गौरव गुप्ता या बिझनेसमनशी लग्न केलं होतं. खूप धूमधडाक्यात ते लग्न झालं होतं. लग्नाआधी या दोघांनी एकमेकांना दोन वर्ष डेट केलं होतं. आणि लग्नानंतर काहीच महिन्यात तिनं नवऱ्यापासून म्हणजे गौरवपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. तिनं नवऱ्यापासून वेगळं होण्याचं कारण कौटुंबिक अत्याचार होते असं कारण सांगितलं होतं. गौरव गुप्ताच्या कुटुंबावर मंदानानं खूप गंभीर आरोप केले होते. गेल्याच वर्षी या दोघांचा घटस्फोट झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT