looks of Shivaji Maharaj Jijabai and Aurangzeb released from film Tanhaji 
मनोरंजन

Tanhaji : 'पत्थर से ठोकर तो सब खाते हैं, पत्थर को ठोकर मारे वो मराठा!'; पोस्टर रिलीज

सकाळ डिजिटल टीम

मागील काही दिवस ऐतिहासिक चित्रपटांना चांगले दिवस आलेत. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीनेही शिवाजी महाराजांचा इतिहास मोठ्य़ा पडद्यावर दाखविण्यासाठी अजय देवगण सज्ज आहे. दोन दिवसांपूर्वीच अजयने 'तानाजी : द अनसंग वॉरियर' चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला होता. यात भारदस्त तानाजींचे पोस्टर अजयने शेअर केले होते. पण आज या टीमने काही विशेष भूमिकांचे पोस्टर शेअर केले आहेत.

अजय देवगण आणि काजोलने दोन दिवसांपूर्वी हातात तलवार घेऊन, करारी नजर आणि भारदस्त शरिरयष्टी असलेल्या तानाजींचा फर्स्ट लूक ट्विटरवर पोस्ट केला होता. आज खुद्द छत्रपती शिवाजी महाराज, जिजाबाई आणि औरंगजेब यांचे पोस्टर शेअर केले आहेत. शरद केळकर याने शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद अगदी परफेक्ट दिसतोय. शिवाजी महाराजांचा हा लूक शेअर करताना काजोलने लिहिले आहे की, 'पत्थर से ठोकर तो सब खाते हैं, पत्थर को ठोकर मारे वो मराठा!' जिजाबाईंच्या भूमिकेत पद्मावती राव या शोभून दिसत आहेत. त्यांच्या लूकला 'जब तक कोंढाणा पे भगवा नहीं लेहराता, हम जूते नहीं पेहनेंगे, असे कॅप्शन दिले आहे. ल्यूक केनी हा अभिनेता औरंगजेबाची भूमिका साकारतोय. त्याच्या लूकला 'हम मुक्कमल हिंदुस्तान को फतेह करने का इरादा रखते हैं' असे कॅप्शन दिले आहे.

अजयची पत्नी व अभिनेत्री काजोलने तानाजीचे पोस्टर शेअर होते. 'गड आला पण सिंह गेला' अशी उपाधी ज्या तानाजी मालुसरेंसाठी वापरली गेली, त्या तानाजींच्या जीवनपटावर आधारित हा चित्रपट असेल. काजोलने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये भारदस्त रूपात, हातात तलवार घेऊन अजय तानाजींच्या भूमिकेत दिसतोय. या पोस्टरवर 'स्वराज्य से बढकर क्या?' असे लिहिले आहे. पोस्टरवरून हा चित्रपट कसा असेल याची कल्पना येते. तर अजय अतुलने या चित्रपटाला संगीत दिले आहे. 

आज शेअर केलेल्या या पोस्टरमुळे चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. मराठमोळा ओम राऊत हा या चित्रपटाचे दिग्दर्शन करतोय. तर उदयभानाच्या भूमिकेत सैफ अली खान दिसेल. तानाजींच्या पत्नीची भूमिका काजोलच साकारणार अशी चर्चा आहे. 10 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल. हा चित्रपट अजय देवगणचा 100 वा चित्रपट असल्याने त्याला एक वेगळे व विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

Monday Morning Breakfast Recipe: ना लसूण, ना कांदा घरच्या घरी झटपट बनवा व्हेगन कबाब, सोपी आहे रेसिपी

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT