suyash tilak, ayushi bhave, valentine day SAKAL
मनोरंजन

Valentine's Day Suyash Tilak: खोल खोल पाण्यात प्रेमाची बुडी! सुयश - आयुषीला किसिंगचा मोह आवरेना...

अभिनेता सुयश टिळक यानेही त्याची बायको आयुषी भावे सोबत खास रोमँटिक फोटो शेयर केलाय

Devendra Jadhav

Valentine's Day Suyash Tilak - Ayushi Bhave News: आज व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर मराठी सेलिब्रिटींच्या प्रेमाला उधाण आलंय. अनेक मराठी सेलिब्रिटी त्यांच्या जोडीदारासोबत खास रोमँटिक फोटो शेयर करत आहेत.

अशातच मराठी अभिनेता सुयश टिळक यानेही त्याची बायको आयुषी भावे सोबत खास रोमँटिक फोटो शेयर केलाय. या फोटोत सुयश आणि आयुषी थेट पाण्याच्या तळाशी गेले असून त्यांनी सेल्फी काढलाय.

सुयशने आज व्हॅलेंटाईन डे निमित्ताने बायको आयुषीसोबतचा एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोत सुयश आणि आयुषी यांनी एकमेकांसोबतचा फोटो शेयर केलाय. या फोटोत हे दोघे अंडरवॉटर जाऊन एकमेकांना किस करत आहेत.

"उफ्फ ये दिल क्या करे.. व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा !! आज प्रेम, मिठी आणि चुंबन आणि सर्व आहे!!" असं खास रोमँटिक कॅप्शन सुयशने या फोटोला दिलंय.

२२ ऑक्टोबर २०२१ ला पुण्यात अत्यंत थाटामाटात सुयश-आयुशीचा विवाहसोहळा पार पडला. ७ जुलै २०२१ रोजी या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. सुयशच्या पुण्याच्या घरीच या दोघांचा साखरपुडा पार पडला होता.

आयुशी भावे ही अभिनेत्री आणि डान्सर आहे. २०१८ मध्ये ती महाराष्ट्राची 'श्रावणक्वीन' या किताबाची मानकरी ठरली होती.

एका कार्यक्रमात सुयश आणि आयुषी दोघांची पहिल्यांदा भेट झाली. पहिल्या भेटीतच त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती आणि हळूहळू त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सुयश आणि आयुषीच्या आवडीनिवडी जवळपास सारख्याच आहेत.

दोघांनाही फिरायला आवडतं, पाळीव प्राणी आवडतात. सुयशच्या पुण्याच्या घरीच मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत साखरपुड्याचं आयोजन करण्यात आलं होतं. दोघांनाही साऊथ इंडियन पद्धत फार आवडते.

त्यामुळे साखरपुड्याच्या वेळी सुयश आणि आयुषी यांनी खास साऊथ इंडियन पद्धतीचा पेहराव केला होता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीसाठी कशी असावी भारताची Playing XI? अश्विनने निवडला संघ

Thane News: सिद्धेश्वर तलाव परिसराचा कायापालट होणार! जागतिक दर्जाचा वॉटरफ्रंट प्रकल्प उभारणार; ठाण्याला नवे बिझनेस हब मिळणार

Live Marathi News Update : मला माझ्या सामान्य आयुष्यात परत जायचे आहे - अभिजीत दिपके

आमचा सर्वात मोठा आशीर्वाद आला... अभिनेत्री करिश्मा तन्ना झाली आई, गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर दिला गोंडस मुलाला जन्म

Career Numerology : 'या' मुलांकाचे लोक पगारवाढ मिळवण्यात असतात भाग्यवान; नशीब देतं अपेक्षेपेक्षा खूप जास्त यश

SCROLL FOR NEXT