LSD 2 Release Date Out Love Sex Aur Dhokha 2 Release Date  Esakal
मनोरंजन

Love Sex Aur Dhokha 2: पुन्हा होणार लव्ह, सेक्स आणि धोका पण यंदा असणार...! रिलिज डेट आली समोर..

Vaishali Patil

LSD 2 Release Date Out: गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित झाले मात्र यात काहीच चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करु शकले. त्यातच आता आणखी काही चित्रपट प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहेत. यात काही चित्रपट हे रिमेक आहेत, काही नव्या कथेसोबत तर काही पहिल्या पार्टचे सिक्वेल असणार आहेत. या यादीत आत 'लव्ह सेक्स और धोखा' या चित्रपटाचाही सामावेश झाला आहे.

2010 मध्ये लव्ह सेक्स और धोखा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. एकता कपूर निर्मित केलेल्या या चित्रपटात राजकुमार राव आणि नुसरत भरुचा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित 'लव्ह सेक्स और धोखा' हा चित्रपट लोकांना आवडला. 2 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 10 कोटींची कमाई केली.

'लव्ह सेक्स और धोखा' हा चित्रपट आवडणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. या चित्रपटाचा दुसरा भागही येणार आहे .

एकता कपूरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून 'लव्ह सेक्स और धोखा 2' चित्रपटाची रिलीज डेट सांगितली.

आता बालाजी टेलिफिल्म्सने त्यांच्या बहुप्रतिक्षित LSD2 ची अधिकृत रिलिज तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट 16 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

मात्र, या चित्रपटातील स्टार्सबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आता पहिल्या भागाप्रमाणेच 'लव्ह सेक्स और धोखा 2' या चित्रपटात फक्त राजकुमार राव आणि नुसरत भरुचाच दिसणार की नवे कलाकार दिसणार हे आता लवकरच कळेलं.

(Love Sex Aur Dhokha 2 Release Date )

'लव्ह सेक्स और धोखा 2' बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड आणि कल्ट मूव्हीज प्रस्तुत आहे. ज्याची निर्मिती एकता आर कपूर आणि शोभा कपूर यांनी केली असून दिबाकर बॅनर्जी यांनी दिग्दर्शिन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video Tarabai Memorial : औरंगजेबाला गाडणाऱ्या ताराराणींचे पन्हाळ्यावर स्मारक का नाही? सर्वपक्षीय नेत्यांना चॅलेंज देणारा व्हिडिओ...

Vijay Hazare Trophy : वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला! अवघ्या ३६ चेंडूंत झळकावले शतक; मोडला शाहिद आफ्रिदीचा विक्रम...

चारित्र्याच्या संशयावरुन भयंकर शेवट; सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीने बँकर पत्नीची गोळ्या झाडून केली हत्या, दोन मुलं असतानाही उचललं टोकाचं पाऊल

BMC Election: मुंबईचं राजकारण हादरलं! उद्धव–राज ठाकरे युतीचा गुप्त फॉर्म्युला समोर, थेट संघर्ष होणार... महायुतीची तातडीची बैठक!

Panchang 24 December 2025: आजच्या दिवशी नारायण कवच या स्तोत्राचे पठण आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT