Maamla Legal Hai Ravi kishan movie  esakal
मनोरंजन

Maamla Legal Hai Trailer : कोर्टातच जेव्हा उडतात हास्याचे फवारे! 'मामला लीगल है' ट्रेलर एकदा पाहाल तर खळखळून हसाल

गेल्या काही दिवसांपासून कोर्ट ड्रामा (Maamla Legal Hai Trailer) हे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होताना दिसत आहे. त्यात आणखी एका नावाची भर पडली आहे.

युगंधर ताजणे

Maamla Legal Hai Trailer : नेटफ्लिक्सवर सध्या मनोरंजनाचा वेगवेगळा तडका दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच किंग खान शाहरुखचा डंकी या (Dunki On Netflix) ओटीटीवर प्रदर्शित झाला. त्यापूर्वी जानेवारीत रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित अॅनिमललाही नेटफ्लिक्सवरुन मोठा प्रतिसाद (Animal On Netflix) मिळाल्याचे दिसून आले होते.

या सगळ्यात प्रसिद्ध दिग्दर्शक राहुल पांडे यांची एक कॉमेडी फिल्म (Rahul Pandey Director) मामला लीगल है चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Maamla Legal Hai Trailer Latest News) ज्यांनी जॉनी एलएलबी आणि जॉनी एलएलबी २ पाहिला असेल त्यांना मामला लीगल है मध्ये फारसं काही वेगळं दिसणार नाही. पण त्यातील संवाद आणि कथा यामुळे त्यात अनेकांनी त्या ट्रेलरचे कौतुक केले आहे.

प्रसिद्घ अभिनेता आणि खासदार रवि किशनची त्या चित्रपटामध्ये Maamla Legal Hai Trailer Viral News) महत्वाची भूमिका आहे. याशिवाय निधी बिष्ट, अनंत वी जोशी, नायला ग्रेवाल, अंजुम बत्रा, विजय राजोरिया, यशपाल शर्मा सारखे कलाकार या फिल्ममध्ये दिसून येणार आहेत. एक मार्च रोजी ही फिल्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ट्रेलरमध्ये पटपडगंज न्यायालयातील गमती जमती दाखवण्यात आल्या आहेत. कोर्ट, त्यातील वकील, पक्षकार, आरोपी, फिर्यादी या साऱ्या गोष्टी मोठ्या प्रभावीपणे त्या ट्रेलरमधून आपल्यासमोर येतात. ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून आता चाहत्यांना चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्याचे वेध लागले आहे.

राहुल पांडेनं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये रविकिशननं लीड रोल केला आहे. तर यशपाल शर्मा दुय्यम भूमिकेत आहे. सध्या व्हायरल झालेल्या ट्रेलरला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्याचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT