made in heaven 2 release day before in amazon prime sobhita dhulipala arjun mathue zoya akhtar farhan akhtar SAKAL
मनोरंजन

Made In Heaven 2: एक दिवस आधीच रिलीज झालाय मेड इन हेवन 2, काय आहे वेबसिरीजची कथा? जाणुन घ्या

मेड इन हेवन 2 मध्ये पुन्हा एकदा शोभिता धुलिपाला आणि अर्जुन माथूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत

Devendra Jadhav

Made In Heaven 2 News: मेड इन हेवन या बहुप्रतिक्षित मालिकेचा सीझन 2 १० ऑगस्टला रिलीज होणार आहे. मेड इन हेवन 2 मध्ये पुन्हा एकदा शोभिता धुलिपाला आणि अर्जुन माथूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय वेबसिरीजमध्ये अनेक नवीन कलाकार सहभागी झाले आहेत.

मेड इन हेवन 2 वेबसिरीजची कथा पुन्हा एकदा मानवी भावभावनांचे चित्रण आपल्याला दाखवते. जिथे पहिला सीझन संपला, तिथून दुसऱ्या सीझनची कहाणी सुरू होते, जिथे तारा खन्नाला कळतं की आदिलने तिच्याशी फसवे लग्न केले आहे... मग पुढे काय होतं?

(made in heaven 2 release day before in amazon prime sobhita dhulipala arjun mathue zoya akhtar farhan akhtar)

मेड इन हेवन 2 ची कथा

मेड इन हेवन 2 ची कथा तारा खन्नाच्या फसवणुकीच्या प्रकरणापासून सुरू होते. तर दुसरीकडे, ताराचा बिझनेस पार्टनर करण मेहरा त्याच्या लैंगिकतेबद्दल खूप चिंतेत आहे. चौथे पात्र म्हणजेच वेडींग प्लॅनर म्हणुन काम करणारी जॅझ तिच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांचा भार उचलताना दिसत आहे.

त्यानंतर पाचवे पात्र कबीर दाखवले जाते ज्याने त्याचा डॉक्युमेंटरी पूर्ण केला आहे. कथा ६ महिन्यांच्या लीपने दाखवली आहे. जिथे तारा आणि आदिल घटस्फोट घेणार आहेत आणि करणची आई आपल्या मुलाची लैंगिकता काही वेगळी आहे हे स्वीकारू शकत नाही.

मेड इन हेवन 2 च्या कथेत ट्विस्ट

मेड इन हेवन 2 मध्ये पुढे पहायला मिळतं, तारा आणि करणचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य दोन्ही धोक्यात आहे. पुढे त्यांच्या आयुष्यात एका ऑडिटरची एंट्री होते, ज्याचे नाव आहे बुलबुल जोहरी. बुलबुलची भूमिका मोना सिंगने साकारली आहे. मग पुढे काय होतं त्याची रंजक कहाणी म्हणजे मेड इन हेवन 2.

यावेळी मेड इन हेवन 2 च्या कथेमध्ये, परिपूर्ण विवाहांमागील काळी बाजू दाखवण्यात आली आहे. ज्यामध्ये घरगुती हिंसाचार, वर्णभेद, ड्रग्स, जातिवाद, लैंगिकता आणि महिलांच्या समस्येचा समावेश आहे. अॅमेझॉन प्राईमने मेड इन हेवन 2 एक दिवस आधीच म्हणजेच ९ ऑगस्टला रात्री रिलीज केल्याने चाहते खुश आहेत

मेड इन हेवन 2 मध्ये हे कलाकार झळकणार

मेड इन हेवन 2 मध्ये शोभिता धुलिपाला, अर्जुन माथुर, जिम सर्भ, कल्की कोचलिन, शशांक अरोरा, शिवानी रघुवंशी आणि विजय राज या कलाकारांसोबतच मोना सिंग, इश्वाक सिंग आणि त्रिनेत्रा हलदर हे नवे चेहरेही पाहायला मिळणार आहेत.

या सीरीजचे दिग्दर्शन अलंकृता श्रीवास्तव, नीरज घेवान, नित्या मेहरा, रीमा कागटी आणि झोया अख्तर यांनी केले आहे तर रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांची एक्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंट आणि झोया अख्तर व रीमा कागटी यांची टायगर बेबी यांनी या सीरिजची निर्मिती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Badlapur Tushar Apte Resignation : बदलापुरातील तुषार आपटेंचा अवघ्या २४ तासांत राजीनामा, भाजपने स्विकृत नगरसेवकपद दिल्याने जोरदार टीका

NMMC Election: मेट्रो प्रकल्पासह तुर्भे- खारघर टनेल प्रकल्पांना गती... शिंदे शिवसेनेचा जाहीरनामा, काय लिहिलयं?

Eknath Shinde : नाशिकमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; ठाकरेंच्या आरोपांना एकनाथ शिंदे काय उत्तर देणार?

Highway Parking Rule: महत्त्वाची बातमी! महामार्गावरील पार्किंग नियमांमध्ये मोठे बदल; वाहनांसाठी नवीन दर निश्चित

Safe Investment : FD-RD, म्युच्युअल फंड्स की सोनं? कुठे किती नफा, कुठे किती धोका? गुंतवणूक करण्याआधी हे गणित नक्की समजून घ्या!

SCROLL FOR NEXT