madhur bhandarkar book launch society achievers by cm eknath shinde  SAKAL
मनोरंजन

CM Eknath Shinde: मधूर भांडारकरांच्या पुस्तकाचं मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते प्रकाशन, लेक लाडकी योजनेचं कौतुक

मधूर भांडारकरांच्या पुस्तकाचं मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते प्रकाशन

Devendra Jadhav

CM Eknath Shinde Book Launch of Madhur Bhandarkar: आज मुंबई मॅग्नेट पब्लिशिंग प्रा. लि. आयोजित 'सोसायटी अचीव्हर्स' मासिकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी मधूर भांडारकर यांंचं मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं.

सोसायटी अचीव्हर्स हे प्रतिष्ठित मासिक आहे. यंदा या मासिकाच्या कव्हर पेजवर मधूर भांडारकर यांना स्थान मिळालंय. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मधूर भांडारकरांच्या संघर्षाची दखल घेत त्यांचं अभिनंदन केलंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकाशन सोहळ्यात भावना व्यक्त केल्या. शिंदे म्हणतात, "सोसायटी मॅक्जिनचे आभारी आहे की, ते चांगल्या लोकांना शोधून पुरस्कार देत आहेत. मी पण या कव्हर पेजवर आलो होतो. माझाही संघर्ष आहे. समाजसेवक हा इतर पद्धतीने त्याची सेवा करत असतो. माझीही सुरुवात ही शिवसैनिकापासून झाली. आज मी मुख्यमंत्री आहे. पण माझे पाय जमिनीवर आहे."

पुढे मुख्यमंत्र्यांनी मधूर भांडारकर यांच्या कामाचं कौतुक केलं. याशिवाय लेक लाडकी योजनेचा उल्लेख केला. शिंदे म्हणाले, "लेक लाडकी हा आम्ही घेतलेला निर्णय महिलांसाठी आहे. महिलांच्या हितासाठी आहे. अनेक निर्णय घेतलेत ते सांगितले तर मधुर भंडारकर बाजूला राहतील. भांडारकर साहेब तुमची इंडस्ट्री खूप मोठी आहे. त्यासाठी काही करायचं असल्यास त्यांनी सांगावं. वर्षा हा बंगला आपल्या सर्वाचा आहे. आपल्यासाठी वर्षाचे दरवाजे सदैव उघडे आहेत. अनेकांना वाटतं हे खूप पैसे कमवतात. मात्र त्याचं दुकानं त्यांनाचं माहीत! पण आमच्याकडून काही करायचं असल्यास आम्ही नक्की करु."

मुख्यमंत्री शेवटी म्हणाले, "भांडारकरांनी अनेक चित्रपट काढले. जे समाजाला आरसा दाखवणारे आहेत. भांडारकर हे खूप फिरतात मीही फिरतो. फिरल्याने तेथील ग्राऊंड रिअॅलिटी कळते. आपण गेल्याने पूर्ण टिम अलर्ट होते. कोणतीही फिल्मी बॅकग्राऊंड नसताना मधूर भांडारकर यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. मराठी कुटुंबातून आलेला युवक हिंदी इंडस्ट्रीत स्वतःचं नाव कमावतो याचा मला आनंद आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना मंत्री किरेन रिजिजू दोनदा भेटले; सत्ताधारी-विरोधकांची कोंडी फुटणार का? विरोधी पक्षनेते काय म्हणाले?

Shivsena Supreme Court Hearing: शिंदेंना घाम फोडणारा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद, आज सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Marathi News Live Updates : दिल्ली येथे २०९ किलो वजन असलेल्या 'सुपर-सुपर ओबेसिटी'च्या रुग्णावर यशस्वी बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया

Rashi Bhavishya: कामिका एकादशीला महालक्ष्मी राजयोग; 'या' ३ राशींचं नशीब उजळणार? आयुष्यात येणार सुख-समृद्धी, ते पैशांसोबत नशिबाची साथ

PM Shri Innovation Visit: राज्यस्तरीय पाहणीमध्ये पीएम श्री गणोरी शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची दाद

SCROLL FOR NEXT