Madhuri Dixit new home  esakal
मनोरंजन

Madhuri Dixit: दसऱ्याचा मुहूर्त! माधुरीनं घेतलं 40 कोटींचे घर

बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं गेल्या तीन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या माधुरीनं दसऱ्याच्या निमित्तानं एक गोड बातमी दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Madhuri Dixit New Home: बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं गेल्या तीन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या माधुरीनं दसऱ्याच्या निमित्तानं एक गोड बातमी दिली आहे. ती ऐकताच चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. गेल्या काही दिवसांपासून माधुरीच्या नव्या घराची चर्चा रंगली होती. माधुरीनं आता मुंबईमध्ये एक लक्झरियस घर खरेदी केलं आहे. सी फेसिंग अपार्टमेंटमध्ये तिनं खरेदी केलेलं घर हे चाहत्यांच्या चर्चेचा विषय आहे. दसऱ्याच्या निमित्तानं त्याचे काही फोटोही व्हायरल झाले आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरीच्या नव्या घराची किंमत ही 48 कोटी रुपये आहे. अभिनेत्रीनं मुंबईच्या लोअर परेलच्या भागात घर खरेदी केली आहे. 53 व्या मजल्यावर माधुरीनं घेतलेलं घर चाहत्यांना भावलं आहे. माधुरी सध्या वेगवेगळ्या रियॅलिटी शोमध्ये दिसून येते. त्यात झलक दिखला जा मध्ये ती परिक्षकाच्या भूमिकेत आहे. सोशल मीडियावर आपल्या अनोख्या अंदाजासाठी माधुरी नेहमीच चर्चेत असते. तिला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. माधुरीनं खरेदी केलेल्या घराचे रजिस्ट्रेशन हे 28 सप्टेंबर 2022 रोजी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोअर परिसरातील इंडिया बुल्स ब्ल्यु परिसरामध्ये तिनं हे घर खरेदी केलं आहे. माधुरीचं हे नवं घर हे सी फेसिंग आहे. त्यातून दिसणारा नजारा हा भलताच सुंदर आहे. त्या घरामध्ये एक मोठा स्विमिंग पुल, जीम, स्पा, क्लब अशा सोयी सुविधा आहेत. माधुरीचा हा फ्लॅट 5 हजार 384 स्क्वेअर फुट एरियामध्ये विस्तारलेला आहे. याशिवाय तिला सात पार्किंग स्लॉट मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विदर्भातही बिबट्याची दहशत! नागपुरातील भांडेवाडी परिसरात वावर, वनविभागाचं पथक दाखल

Winter Weather Severe : पुढील आठ दिवस हाडे गोठवणारी थंडी पडणार, वेधशाळेचा अंदाज; थंडीची लाट कायम

बाळानं उडता तीर अंगावर घेतलाय, ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांनाच....; अजितदादांच्या शिलेदारांची राजन पाटलांना वॉर्निंग

International Men's Day: अल्फा, बीटा की सिग्मा... पुरुषांनो तुम्ही कोणत्या पर्सनॅलिटी टाईपमध्ये मोडता?

Viral Photo : विकी कौशल–कतरिनाच्या बाळाचा फोटो व्हायरल? चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण; खरं काय ते समोर आलं

SCROLL FOR NEXT