madhuri 
मनोरंजन

लॉकडाऊनमध्ये मिळणार माधुरीकडून डान्स शिकण्याची संधी..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई-  कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन घोषित केले आहे. यामुळे अनेक जण आपला विरंगुळा म्हणून व्यायाम, चित्रकला सारख्या कलेंमध्ये रमत आहेत. आता बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दिक्षीत या लॉकडाऊनच्या दिवसात एक नव्या संकल्पनेसह प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

सर्वांनाच माहितच आहे की माधुरी तिच्या 'डान्स विथ माधुरी' याद्वारे ऑनलाईन नृत्यांचे धडे देत असते. आता ती 'डान्स विथ माधुरी' याद्वारे आठवड्यातून दोन ते तीन दिवस
चाहत्यांना विनामुल्य प्रशिक्षण देणार आहे. यासाठी तिच्यासोबत तिची टिम आणि नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लुईस, रेमो डिसूजा, नृत्यदिग्दर्शिका सरोज खान आणि पंडित बिर्जू महाराज जी हे नृत्यदिग्दर्शक तिच्यासोबत एकत्र येणार आहेत. याची माहिती माधुरीने 'डान्स विथ माधुरी' आणि तिच्या स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. 

या विनामुल्य नृत्य अकॅडमीमध्ये आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोणतेही दोन लोकप्रिय नृत्यप्रकार शिकवण्यात येणार आहे. माधुरी सर्वांना घरातच राहण्याचे आवाहन करत आहे आणि याशिवाय तिने नृत्याचे धडे शिकण्यास प्रोत्साहन दिले आहे. हे विनामूल्य नृत्यप्रशिक्षणाचे धडे महिनाभर म्हणजेच 1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत देण्यात येणार आहेत.  या विनामूल्य नृत्यांच्या धड्याशिवाय प्रेक्षक यावर त्यांच्या नृत्यांचे व्हिडिओ पाढवू शकतात आणि त्यांना माधुरीसोबत व्हिडिओ कॉलवर संवाद साधण्याची संधी मिळू शकते.. 

याबाबत माधुरी म्हणली की, 'सर्वांना ताणवमुक्त करण्यासाठी आणि नृत्याचा आनंद घेण्यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. नृत्य हा व्यायामाचा एक उत्कृष्ट प्रकार आहे. त्यामुळे आता या विनामूल्य नृत्य क्लासेसने प्रत्येकाचा एक प्रकारचा व्यायामच होणार आहे.' माधुरीचा हा व्हिडिओ पाहताच नृत्य प्रेमींनी यावर कमेंट्स करून आनंद व्यक्त केला आहे.

madhuri dixit to conduct free online dance classes during lockdown

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Tragedy : चॅटजीपीटीवरून कॉपी करताना पकडला, पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

Ajit Agarkar : "मलाच या पदावर आता राहायचे नाही, तुम्ही नवीन अध्यक्ष शोधा..."; अजित आगरकरचं पत्र, BCCI कडूनही उत्तर; फुल ड्रामा

Latest Marathi News Update : अखेर भुलेश्वर राजाची मुर्ती पुन्हा विराजमान, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी

श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांची २५० कोटींची संपत्ती कुणाला मिळाली? मृत्यूनंतरही वर्षाला मिळणारे १३ कोटी कुणाच्या खात्यात जातात?

Monsoon Returns in Marathwada : मराठवाड्यात चार दिवस परतीचा पाऊस रविवारपासून हजेरी, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त

SCROLL FOR NEXT