Madhuri Dixit Birthday esakal
मनोरंजन

Madhuri Dixit Birthday : 'विनोद खन्ना काही ऐकेना, माधुरीला सोडेना!' तो 'किसिंग सीन' आजही...

माधुरीसारख्या अभिनेत्रीनं त्यावेळी तितका बोल्ड सीन देणं हे तिच्या चाहत्यांसाठी धक्कादायक होतं.

सकाळ डिजिटल टीम

Madhuri Dixit Happy Birthday Bollywood Actress : बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित ही गेल्या तीन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करते आहे. माधुरीचा अभिनय, तिचं सौंदर्य, तिचा डान्स यामुळे तिनं अमाप लोकप्रियताही मिळवली. आजही माधुरी ही वेबसीरिज, चित्रपट, टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील काही रियॅलिटी शो यामुळे प्रसिद्धीच्या झोतात असते.

आज माधुरीचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं सोशल मीडियावर तिच्या लाखो चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. तिला मोठ्या प्रमाणावर शुभेच्छाही दिल्या आहेत. ९० च्या दशकांत माधुरीनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. दिल, बेताब, बेटा, हम आपके है कौन, परींदा, दिल तो पागल है, राम लखन, कोयला चित्रपटांतून माधुरीच्या अभिनयानं प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन केले. माधुरीच्या नावाचं ग्लॅमर हे कित्येक वर्षे बॉलीवूडमध्ये चर्चेत राहिलं. त्याचे कारण माधुरीचा साधेपणा आणि त्याचं ग्लॅमर.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यासगळ्यात माधुरीच्या एका चित्रपटानं तिला नेहमीच चर्चेत ठेवलं. त्यावरुन तिच्यातील बोल्डनेसही दिसून आला. माधुरी अशा बोल्डनेसमध्ये यापूर्वी कधी दिसली नव्हती. पण त्या चित्रपटातून तिचा वेगळाच अंदाज समोर आला होता. तो चित्रपट होता दयावान. दिवंगत प्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना हे त्या चित्रपटात प्रमुख अभिनेते होते. माधुरीनं त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. विनोद खन्नांसारख्या अभिनेत्यासोबत माधुरीला काम करण्याची संधी मिळाली खरी पण, त्यामुळे तिच्यावर टीकाही झाली होती.

माधुरीसारख्या अभिनेत्रीनं त्यावेळी तितका बोल्ड सीन देणं हे तिच्या चाहत्यांसाठी धक्कादायक होतं. याचं कारण म्हणजे यापूर्वी माधुरीनं तिच्या कोणत्याही चित्रपटातून किसिंग सीन दिला नव्हता. जो दयावानमध्ये दिला. पण त्यात अभिनेता विनोद खन्ना तो सीन देताना एवढे आऊट ऑफ कंट्रोल झाले होते की दिग्दर्शकानं तो सीन संपला असे तीनवेळा सांगूनही ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक मुलाखतींमधून त्याविषयीचे किस्से समोर आले आहेत. बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटींनी देखील त्याबद्दल सांगितले आहे. त्यावेळच्या लोकप्रिय सिनेमासिकांनी तिखट मीठ लावून छापलेल्या या गोष्टीनं त्यावेळी वाचकांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News :...तर पुण्यात संध्याकाळी ७ पर्यंतच पेट्रोल पंप सुरु ठेऊ; पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा थेट इशारा, कारण काय?

Kolhapur Politics : संजय पाटील यड्रावकर आणि राजू शेट्टींचे पीए स्वस्तिक पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी, "तुमचा काय संबंध"; नगपरिषदेतच हाय व्होल्टेज ड्रामा

Latest Marathi Breaking News Live Update : नागपूरमध्ये काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

Nagpur Land Survey : नवीन नागपूरसाठी जमिनीच्या संयुक्त मोजणीला सुरुवात; शेतकऱ्यांचे सहकार्य; विविध यंत्रणांचा सहभाग!

Pune Traffic : पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा; चारही महामार्ग जोडणारा ४५ किमीचा 'ट्विन टनेल' भूमिगत रस्ता प्रस्तावित

SCROLL FOR NEXT