Madhuri Dixit Birthday  esakal
मनोरंजन

Madhuri Dixit Birthday : 'चोली के पिछे क्या है' दूरदर्शनं घातली होती बंदी! रेडिओनं तर...

सुभाष घई दिग्दर्शित खलनायक जेव्हा ९० च्या दशकांत आला तेव्हा त्या चित्रपटाची खूपच चर्चा होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं विक्रमी कमाई केली होती.

सकाळ डिजिटल टीम

Madhuri Dixit Happy Birthday Khalnayak : माधुरी ही जशी तिच्या अभिनयासाठी ओळखली जायची तशीच ती तिच्या डान्ससाठीही चाहत्यांच्या मनात घर करुन होती. माधुरीसारखी दुसरी डान्सर होणे नाही अशा चर्चाही नेहमीच होत असायच्या. तेजाब, दिल, खलनायक, दिल तो पागल है, देवदास या चित्रपटांतून माधुरीच्या डान्सनं प्रेक्षकांना वेडं केलं होतं.

सुभाष घई दिग्दर्शित खलनायक जेव्हा ९० च्या दशकांत आला तेव्हा त्या चित्रपटाची खूपच चर्चा होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं विक्रमी कमाई केली होती. संजय दत्त, जॅकी श्रॉफ, माधुरी दीक्षित यांच्या त्या चित्रपटांत प्रमुख भूमिका होत्या. याच चित्रपटातील ते चोली के पिछे क्या है नावाचे गाणे खूपच लोकप्रिय झाले होते. आता ते गाणं कदाचित इतकं बोल्ड वाटणार नाही. पण त्यावेळी त्या गाण्यावरुन झालेला वाद खूपच मोठा होता.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

माधुरीनं तीन दशकांहून अधिक काळ तिच्या नृत्यानं चाहत्यांचे मनोरंजन केले. मात्र यात तिचा खलनायक मधील तो डान्स आणि ते गाणं नेहमीच चाहत्यांच्या आवडीचा आणि चर्चेचा विषय राहिला आहे. तिच्या करिअरमध्ये त्या गाण्यावरुन झालेला वाद काही विसरता येण्यासारखा नाही. आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या त्या गाण्याला साज चढवला तो लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी. आजही ९० च्या दशकांतील सर्वोत्तम हिंदी गाण्यांमध्ये चोली के पिछे क्या है गाण्याचा समावेश केला जातो.

इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेल्या एका लेखामध्ये चोली के पिछे क्या है हे गाणं आणि त्यावरुन झालेला वाद याविषयी सविस्तर विश्लेषण करण्यात आले आहे. १९९३ च्या उन्हाळ्यात सुभाष घई यांनी खलनायक चित्रपटातील ते गाणं प्रदर्शित केलं होतं. त्या गाण्याचे शब्द एवढे बोल्ड होते की त्यावरुन वादाला सुरुवात झाली होती. जवळपास ३२ संघटनांनी त्यावरुन नाराजीही व्यक्त केली होती.

माधुरीच्या बॉलीवूड करिअरमध्ये त्या गाण्याइतके बोल्ड दुसरे गाणे नव्हते. त्या गाण्यावर त्यावेळी दुरदर्शननं टोकाची भूमिका घेतली होती. ते गाणं ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर प्रसारित होणार नाही. अशी भूमिका त्यावेळी घेण्यात आली होती. त्यावर बंदी घालण्यात आली होती. द्विअर्थी शब्द आणि अश्लीलता असा ठपका त्या गाण्यावर त्यावेळच्या सेन्सॉर बोर्ड आणि काही सामाजिक संघटनांनी ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT