Mrs. Universe India 2023 Esakal
मनोरंजन

Mrs. Universe India 2023: नागपुरच्या माधुरीनं पटकावला 'मिसेस युनिव्हर्स इंडिया 2023'चा किताब!

Vaishali Patil

Mrs. Universe India 2023 Madhuri Patle: देशाची राजधानी दिल्लीत "मिसेस इंडिया-शी इज इंडिया-2023" स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे आयोजन 27 ते 30 ऑगस्टदरम्यान दिल्लीतील उमराव येथे करण्यात आले होते.

या स्पर्धेत नागपूरच्या माधुरी पाटले हिने बाजी मारली आहे. नागपूरच्या माधुरी पाटले हिने 'मिसेस इंडिया-शी इज इंडिया-2023' स्पर्धा जिंकत हा किताब आपल्या नावे केला. माधुरी पाटलेच्या विजयानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तिने कठोर मेहनतीने हा किताब पटकावला आहे. आता माधुरी ही येत्या 1 ते 10 ऑक्टोबर दरम्यान फिलिपिन्सच्या मनिला शहरात आयोजित करण्यात आलेल्या आगामी मिसेस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

'मिसेस युनिव्हर्स इंडिया 2023'चा किताब माधुरीने जिंकला तर या स्पर्धेची फर्स्ट रनर अप म्हणुन शिवानी बागडिया तर सेकंड रनर अप ऐश्वर्या देशमुख ही ठरली.

'मिसेस युनिव्हर्स इंडिया 2023'चा किताब जिंकल्यानंतर माधुरीने आनंद व्यक्त केला. हा विजय केवळ मेहनत आणि चिकाटीने मिळवला आहे. हा मुकुट परिधान करतांना स्वप्न पाहण्याची आणि ते पुर्ण करण्यासाठी मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना पार करत ती स्वप्न पुर्ण करण्याची हिंमत असलेल्या प्रत्येक महिलेचे प्रतिनिधित्व करत असल्याची भावना मनात असल्याचं तिनं सांगितल.

तर याप्रसंगी 'शी इज इंडिया'च्या संस्थापिका रिचा सिंग यांनी देखील त्याच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. एका स्वप्नाने 'शी इज इंडिया'चा प्रवास सुरू झाला. आता या कार्यक्रमाची ओळख ही बदल घडवून आणणारा आणि स्त्रियांना आत्मभान देणारा एक व्यासपीठ अशी झाल्याचं त्यांनी सांगितलं.

मिसेस इंडिया शी इज इंडिया 2023 स्पर्धेमध्ये फायनलमध्ये नऊ अंतिम स्पर्धक उरले होते, ऐश्वर्या देशमुख, तान्या पुरी, कांचन शिंदे मुझुमदार, तनिष्क रूपचंदानी, माधुरी पटले, शिवानी बगाडिया, नेहा ब्रेव्ह, यापोली, प्रिया सिंग शुक्ला गुप्ता हे स्पर्धक होते.

मिसेस इंडिया शी इज इंडिया 2023 चे माधुरी पाटले ही केवळ सौंदर्यच नव्हे तर तिला उत्तम समाजभान असल्याचं उदाहरण आहेत. समाजावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासोबतच सामाजिक बांधिलकी दाखवून, मानवी तस्करीला बळी पडलेल्यांच्या बचाव आणि पुनर्वसनासाठी समर्पित NGO ला तिने पाठिंबा दिला आहे. ती ग्रामीण भागातील वंचित मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT