satish kaul  
मनोरंजन

'महाभारत'मध्ये देवराज इंद्रची भूमिका साकारणाऱ्या सतीश कौल यांचं निधन

स्वाती वेमूल

हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमधील ज्येष्ठ अभिनेते सतीश कौल यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. निर्माते अशोक पंडित यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. सतीश कौल यांनी जवळपास ३०० हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. 'महाभारत' या पौराणिक मालिकेत त्यांनी देवराज इंद्रची भूमिका साकारली होती. याशिवाय 'सर्कस' आणि 'विक्रम वेताल' या मालिकांमध्येही त्यांनी काम केलं. गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये त्यांना प्रचंड आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. 

लुधियानात एका छोट्या भाड्याच्या घरात ते राहत होते. त्याआधी ते वृद्धाश्रमात राहत होते. औषधं, भाज्या आणि जीवनावश्यक वस्तूंसाठीही त्यांना आर्थिक चणचण भासत होती. त्यांनी चित्रपटसृष्टीला मदतीचं आवाहन केलं होतं. "अभिनेता असताना माझ्यावर लोकांनी भरभरून प्रेम केलं. पण मला आता एक माणूस म्हणून मदतीची गरज आहे", असं ते म्हणाले होते. 

७४ वर्षीय सतीश कौल यांनी 'प्यार तो होना ही था', 'आंटी नंबर १' या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. "जर लोक मला विसरले असतील तर ठीक आहे. पण मला मिळालेल्या प्रेमासाठी मी त्यांचा खूप आभारी आहे. मी सदैव त्यांचा ऋणी राहीन. मला कोणीतरी काम द्यावं अशी माझी अपेक्षा आहे. मला पुन्हा अभिनय करायचं आहे", अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. 

जवळपास २५ वर्षांपूर्वी त्यांच्या आईवडिलांच्या कॅन्सरवरील उपचारासाठी त्यांना मुंबईतील फ्लॅट विकावा लागला होता. उपचारानंतर उरलेल्या पैशांत त्यांनी बहिणीच्या लग्नाचा खर्च उचलला. काही वर्षांनंतर त्यांनी लुधियानामध्ये अॅक्टिंग स्कूल सुरू केलं. मात्र त्यातही त्यांना आर्थिक फटका बसला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT