Mahabharata's Yudhishthira rained on Adipurush Government should ban movie prabhas SAKAL
मनोरंजन

Adipurush: सरकारने सिनेमावर बंदी घालावी कारण... महाभारताचे युधिष्ठीर आदिपुरुषवर बरसले

गजेंद्र चौहान यांनी आदिपुरुष चौफेर बाजूंनी टीका केलीय

Devendra Jadhav

Adipurush Gajendra Chauhan Comment: आदिपुरुष सिनेमावर जाणकार आणि प्रेक्षक टीका करत आहेत. अशातच महाभारत या गाजलेल्या मालिकेत युधिष्ठीराची भूमिका साकारणारे अभिनेता गजेंद्र चौहान महाभारत मालिकेवर बरसले आहेत.

गजेंद्र चौहान यांनी आदिपुरुष चौफेर बाजूंनी टीका केलीय. आदिपुरुष सिनेमा थिएटरमध्ये पाहावा हे त्यांच्या मनाला पटत नव्हते.

(Mahabharata's Yudhishthira rained on Adipurush Government should ban movie prabhas)

'आदिपुरुष' हा चित्रपट पाहण्यासारखा नाही

गजेंद्र म्हणाले.. ट्रेलर आणि शॉर्ट क्लिप पाहिल्यानंतर 'आदिपुरुष' हा चित्रपट पाहण्यासारखा नाही असे वाटले.

मला माझ्या आस्थेशी कोणतीही तडजोड करायची नव्हती. मला भगवान रामाला फक्त भगवान श्रीराम म्हणूनच बघायला आवडेल.

हा सिनेमा नव्हे तर षडयंत्र

गजेंद्र चौहान यांनी तर या चित्रपटामागे खोल षडयंत्र असून सिनेमाच्या मेकर्सना येणाऱ्या नवीन पिढ्यांना भ्रष्ट करायचे आहे, असे म्हटलंय. ते म्हणाले की, मी टी-सीरीजचे प्रमुख भूषण कुमार यांनाही सांगू इच्छितो की, त्यांनी या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं होतं.

त्यांचे वडील गुलशन कुमार यांच्याप्रमाणेच त्यांनी धार्मिक भावनांचा आदर करावा. भविष्यात अशा गोष्टींना महत्त्व देऊ नये, असेही ते म्हणाले.

डायलॉग बदलले पण उपयोग काय?

गजेंद्र चौहान म्हणाले- आता डायलॉग बदलून उपयोग नाही, कारण नुकसान आधीच झाले आहे. लोकांनी चित्रपट नाकारून निर्मात्याला आधीच शिक्षा केली आहे आणि ते त्यास पात्र आहेत,

त्यांना शिक्षा झाली पाहिजे. सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयावरही गजेंद्र यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि या चित्रपटाबाबत त्यांनाही प्रश्न विचारले जावेत, असे सांगितले.

हा चित्रपट अजिबात प्रदर्शित होऊ नये आणि या संपूर्ण चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, असं त्यांनी सरकारला आवाहन केलंय.

याशिवाय सिनेमातले टपोरी संवाद लिहिणाऱ्या मनोज मुंतशीरवर सुद्धा गजेंद्र चौहान यांनी ताशेरे ओढले. एकूणच आदिपुरुष बद्दल जुन्या दिग्गज कलाकारांनी नाराजी व्यक्त केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT