'Maharashtachi Hasyajatra' to go on a break. Google
मनोरंजन

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' निघाली ब्रेकवर; कारण सांगितलं जातंय...

काही दिवसांपूर्वी विशाखा सुभेदारनं अचानक शो ला रामराम केल्यानं 'महाराष्ट्राची हास्यजत्रे'ला वादाच्या चर्चेचा रंग चढला होता.

प्रणाली मोरे

महाराष्ट्रात घराघरातील प्रेक्षकाला तुफान हसवणारा कॉमेडी शो(Comedy Show) म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा(Maharashtrachi Hasyajatra). गेल्या काही दिवसांत शो चर्चेत आला तो विशाखा सुभेदारनं अचानक शो सोडण्याचा निर्णय घेतला त्या कारणानं. त्यावरनं अनेक मुद्दे उठले खरे पण विशाखानं नंतर वादातीत चर्चेवर पांघरुण घालत शो सोडण्याचा निर्णय आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे,नवीन करायचं आहे या उद्देशानं घेतल्याचं सांगितलं होतं. आता यात किती तथ्य होतं हे विशाखा सुभेदार जाणो,शो चे निर्माते अन् चॅनलवाले. असो,झालं ते विसरा असं म्हणत शो छान सुरू होता. पण अचानक आता बातमी कानावर आली की 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो ब्रेकवर(Break) जातोय कारण.... चला याविषयी जाणून घेऊया सविस्तर('Maharashtachi Hasyajatra' to go on a break.)

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शो मधून 'लॉली','मामा' यांच्यासारखी लोकप्रिय झालेली अनेक कॅरेक्टर्स गेली साडे तीन-चार वर्ष महाराष्ट्राला खळखळवून हासवत असताना अचानक शो का थांबवला जातोय हा प्रश्न सध्या सगळ्याच चाहत्यांचा मनात असणार यात शंकाच नाही.

यासंदर्भात शो चे निर्माते सचिन मोटे म्हणाले,''गेली साडे-तीन चार वर्ष आम्ही 'हास्यजत्रा' करत आहोत. त्यामुळे आता आम्हाला प्रत्येकाला थोडं रिफ्रेश होण्याची गरज आहे. आमच्या शो मध्ये जे वेगवेगळे कॅरॅक्टर्स आहेत त्यावर आतापर्यंत अनेक प्रकारे प्रयोग झाले आहेत. आम्हालाही वाटतं की आता यात नवीन काहीतरी घडायला हवं. त्यात तोच-तोच पणा नसावा. त्यामुळे आता थोडीशी विश्रांती आणि क्रिएटिव्ह ब्रेक गरजेचा होता. पण हा ब्रेक फार मोठा नसेल,आमचं शूटिंग काही दिवसांनी सुरू होईल''.

यासंदर्भात शोच्या अनेक भागांचे दिग्दर्शन केलेले सचिन गोस्वामी म्हणाले,''हा शो म्हणजे खरंतर समाजमनाचा आरसा आहे. गेली साडे तीन वर्ष 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' करीत आहोत. त्यामुळे नव्याचा शोध घेण्याचा ध्यास आता आम्हाला लागला आहे आणि त्यासाठी बाहेर पडण्याची गरज आहे. त्यामुळे आता कल्पनांचा साठा पूर्ण संपायच्या आता बाहेर पडतोय. पाहिलेली माणसं मांडून झाली आता जर सारखं तेच-तेच उपसत राहिलो तर विहिरीत पाणीच राहणार नाही. त्यामुळे पूर्णविराम न देता योग्य अल्पविराम देणं सुद्धा आवश्यक आहे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushila Karki: Gen-Z चा नायक सुशीला कार्कींसमोर नतमस्तक; कोण आहे सुदन गुरुंग?

आता CIBIL Score वाढवण्यासाठी ChatGPT मदत करणार, पण कशी? जाणून घ्या...

Asia Cup, IND vs PAK: 'आम्ही कोणत्याही संघाला...', भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराने दिली वॉर्निंग

विकासासाठी शांतता हवी, मणिपूरमधील संघटनांना पंतप्रधान मोदींचं आवाहन; राज्यातील परिस्थितीवरही बोलले

Madhya Pradesh : मध्य प्रदेशमधील १.२६ कोटींहून अधिक लाडक्या बहिणींना मिळणार आर्थिक लाभ; मुख्यमंत्री यादव यांची घोषणा

SCROLL FOR NEXT