Shivsena Leader Shahaji patil  esakal
मनोरंजन

Viral Song: 'काय झाडी काय डोंगर काय हॉटेल!' गाण्याचा धुमाकूळ!

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मोठा हादरा दिला.

युगंधर ताजणे

Maharashtra political crisis: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मोठा हादरा दिला. त्यांच्यासोबत 40 (shivsena eknath shinde) हून अधिक आमदार असून येत्या काळात हे आमदार नवीन सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याची चर्चा आहे. गुवाहाटीत (social media viral news) असलेल्या या आमदारांचे अनेक व्हिडिओ- ऑडिओ हे व्हायरल झाले आहेत. त्याला सोशल मीडियावरुन मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांच्या संभाषणाची क्लिप काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. सोशल मीडियावर या ऑडिओ क्लिपनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

शहाजी पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्याशी संवाद साधताना गुवाहाटीतील निसर्गसौंदर्याविषयी सांगितले होते. त्यांनी काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल सगळं काही ओक्के अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आता त्यावरुन सोशल मीडियावर पाटील यांच्यावर वेगवेगळे मीम्स व्हायरल झाले आहे. गाणीही नेटकऱ्यांच्या खास चर्चेचा विषय आहे. त्यामुळे पाटील हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. युट्युबवर सध्या काय झाडी काय डोंगर काय हॉटेल या नावानं एक गाणं व्हायरल झालं आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या कमेंटसचा पाऊस पडला आहे. काही क्रिएटिव्ह नेटकऱ्यांनी त्याचे भन्नाट मीम्स तयार केले आहेत.

महाविकास आघाडीसमोर शिवसेनेच्या आमदारांनी मोठं आव्हान निर्माण केलं आहे. काही झालं तरी बंडखोरी केलेले आमदार हे पुन्हा येतील. असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या दिवसांत वेगळं चित्र राज्याच्या राजकीय पटलावर दिसेल अशी आशा जनतेला आहे.

काही दिवसांपासून राज्यातील राजकारण वेगानं बदलत आहे. त्यातील घडामोडी अनाकलनीय अशा स्वरुपाच्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडखोरी त्यांच्या समवेत असलेले आमदार यांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी आघाडी सरकारचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT