kedar shinde, bela shinde, maharashtra shaheer, maharashtra shaheer full movie, maharashtra shaheer showtiming SAKAL
मनोरंजन

Kedar Shinde Birthday: दादरचं इराणी हॉटेल, बन - मस्का अन्.. अशी आहे केदार - बेलाची लव्हस्टोरी

आज केदार शिंदे आणि त्यांची बायको बेला शिंदे यांच्या लग्नाचा वाढदिवस

Devendra Jadhav

Kedar Shinde - Bela Shinde Love Story News: आज केदार शिंदेंचा वाढदिवस. त्यानिमित्ताने पाहूया केदार - बेला यांची लव्हस्टोरी. त्यानिमित्ताने पाहूया केदार शिंदे आणि बेला शिंदे यांची लव्हस्टोरी...

केदारच्या आजवरच्या करियरच्या चढउतारात बेलाने त्याला साथ दिली आहे. दोघांनी टोकाचा स्ट्रगलचा काळ बघितला आहे, आणि नंतर सुखाचे दिवसही पाहिले आहेत.

केदार आणि बेला यांची लव्हस्टोरी जरा हटके आहे. या दोघांच्या लव्हस्टोरीमध्ये १ एप्रिलचं खूप महत्व आहे. चला बघूया..

(maharashtra shaheer director kedar shinde and bela shinde love story)

दोन वर्ष मागे फिरले आणि होकाराची तारीख १ एप्रिल..

बेला यांची थोरली बहीण ‘महाराष्ट्राची लोकधारा’च्या ग्रुपमध्ये डान्स करायची. एक दिवशी बेला आपल्या बहिणीचा डान्स पाहायला गेल्या. बेला यांनाही नृत्याची आवड असल्याने त्यासुद्धा लोकधारा गुपमध्ये सहभागी झाल्या.

त्यावेळी केदार स्वतः तिथे डान्स शिकवायचे. याचकाळात केदार आणि बेला यांची चांगली मैत्री झाली होती.

मैत्रीचं एक पाऊल पुढे टाकण्यासाठी केदार यांनी बेलाला प्रपोज करायचं ठरवलं. पण बेला यांनी केदारला नकार दिला. पण हार मानतील ते केदार कसले..

दोन वर्ष एका मुलीमागे फिरून शेवटी १ एप्रिल १९९१ रोजी बेला यांना केदार शिंदे यांनी होकार दिला.

बेला यांनी होकार दिला खरा पण ती होकार देऊन निघून गेल्यावर आज एप्रिल फुल्ल असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

तिने खरंच होकार दिला की आजच्या दिवसाचे निमित्त साधून आपल्याला मूर्ख बनवले, असा संभ्रम केदार यांना पडला.

याविषयी केदार सविस्तर सांगतात, 'दोन वर्षांची तीच्या मागे मागे केल्यावर बेलाने माझ्या प्रेमाचा स्वीकार केला. अंकुश चौधरी तेव्हा होता माझ्या सोबत.

तीला भेटून ट्रेनचा प्रवास करत आम्ही दादर पुर्वेकडील एका इराणी हॅाटेलात चहा- बनमस्का खाताना, अचानक आठवलं "आयला अंकी, मला बेलाने एप्रिल फूल तर केलं नसेल ना?" त्यावेळी मोबाईल नव्हते.

त्यात तीच्या घरच्या लॅंडलाईनवर फोन करण्याची हिंमत अजिबात नव्हती. ती पुन्हा जोवर भेटली नाही तोवर माझ्यासाठी तीने एप्रिल फूल केलं यावर विश्वास ठेवण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण पण पण.... ती त्या १ एप्रिल रोजी माझ्या आयुष्यात आली ती, बेला के फूल बनून. अशी पोस्ट केदार यांनी लिहिली आहे.

केदार यांनी लग्नाच्या वाढदिवशी बेलासाठी लिहिली खास पोस्ट

प्रिय बेला. गेली २७ वर्षे, माझ्या प्रत्येक वेडेपणात माझ्या पाठीशी उभी आहेस. हे मागचं दिड वर्ष तर मी झपाटल्यासारखा महाराष्ट्र शाहीर मध्ये गुंतलो, पण माझ्या कामात ढवळाढवळ न करता, तू मात्र प्रत्येक आव्हानांना तोंड दिलस.

आत्ता सगळीकडून उत्तम प्रतिसाद मिळत असतानाही शांत संयमी राहाण्याचा नेहमीप्रमाणे सल्ला दिलास. अजून खुप काही करायचं आहे. तुला सुखात ठेवायचं आहे. त्यामुळे आणखीन वेडेपणा साठी तयार राहा. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

अशाप्रकारे केदार यांनी मनातल्या भावना व्यक्त केल्यात. केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर सिनेमा जवळच्या सिनेमागृहात सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT