Maharashtra Shaheer, Maharashtra Shaheer news, Maharashtra Shaheer songs, Maharashtra Shaheer review, Maharashtra Shaheer in america SAKAL
मनोरंजन

Maharashtra Shaheer: शाहिरांचा डफ आता अमेरिकेतही वाजणार, मराठी प्रेक्षकांसाठी अभिमानाची बाब

महाराष्ट्र शाहीरने आणखी एक मजल मारली आहे. महाराष्ट्र शाहीरचे अमेरिकेतल्या प्रेक्षकांसाठी खास शो आहेत.

Devendra Jadhav

Maharashtra Shaheer in America: महाराष्ट्र शाहिर सिनेमा रिलीज झाला आणि सगळीकडे कौतुक मराठी मनोरंजन विश्वात सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमाची.

महाराष्ट्रभर या चित्रपटाची दमदार हवा आहे. प्रेक्षक या चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत.

केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात शाहीर साबळेंच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी झळकत आहे तर त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत सना शिंदे आहे. तसेच अनेक दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात काम केले आहे. आता हा सिनेमा अमेरिकेत झाला आहे.

(maharashtra shaheer marathi movie released in america)

महाराष्ट्र शाहीरने आणखी एक मजल मारली आहे. महाराष्ट्र शाहीरचे अमेरिकेतल्या प्रेक्षकांसाठी खास शो आहेत.

अमेरिकेतल्या डल्लास, शिकागो, San diego, न्यू जर्सी, रीचमंड हील अशा अनेक ठिकाणी ५ ते १४ मे दरम्यान महाराष्ट्र शाहीरचे विशेष शो आहेत.

त्यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या प्रेक्षकांसाठी महाराष्ट्र शाहीर पाहण्याची विशेष संधी मिळणार आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र शाहीर पाहण्याची संधी परदेशातील प्रेक्षकांना मिळणार आहे

अंकुशला आपण आजवर सिनेमा,नाटक आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये वेगवेगळ्या रुपात भेटलोय. गेल्या अनेक वर्षांमध्ये अंकुश चौधरीने महाराष्ट्र शाहीर हा केलेला पहिला बायोपिक आहे.

अंकुशची प्रमुख भूमिका असलेला आणि केदार शिंदेंनी दिग्दर्शित केलेला महाराष्ट्र शाहीर सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला आहे.


महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित महाराष्ट्र शाहीर सिनेमा नुकताच संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

महाराष्ट्र शाहीर सिनेमाचा टिझर, ट्रेलर आणि गाणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. अंकुश चौधरी शाहीर साबळेंची भूमिका साकारत आहे. महाराष्ट्र शाहीर सिनेमा २८ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT