maharashtra shaheer, maharashtra shaheer teaser, maharashtra shaheer news SAKAL
मनोरंजन

Maharashtra Shaheer Teaser: महाराष्ट्र शाहीर सिनेमाचा टिझर प्रदर्शित, सिनेमात दिग्गज व्यक्तिमत्वांची झलक

२८ एप्रिल २०२३ ला महाराष्ट्र शाहीर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Devendra Jadhav

Maharashtra Shaheer Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर सिनेमाची सगळ्यांना उत्सुकता आहे. अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत सिनेमात झळकत आहे. महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. नुकताच महाराष्ट्र शाहीर सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

(maharashtra shaheer teaser out now directed by kedar shinde starring anksuh chaudhari as shaheer sabale)

महाराष्ट्र शाहीर सिनेमाच्या टिझरमध्ये अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत दमदार अंदाजात झळकत आहे. शाहिरांची धगधगती गाथा अंकुश चौधरीने या सिनेमातून जिवंत केलीय. या सिनेमात केदार शिंदेंची लेक सना शिंदे सुद्धा झळकत आहे. सिनेमात मृण्मयी देशपांडे लता मंगेशकरांची भूमिका साकारत आहे. याशिवाय आई कुठे काय करते फेम अश्विनी महांगडे सिनेमात झळकत आहे.

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख मा. राज ठाकरे यांच्या हस्ते सकाळी ११.३० वाजता जिओ वर्ल्ड ड्राइव्ह, वांद्रे येथे महाराष्ट्र शाहीर सिनेमाचा टिझर लाँच करण्यात आला. या खास प्रसंगी शाहिरांच्या पत्नी श्रीमती राधाबाई कृष्णराव साबळे, दिग्दर्शक केदार शिंदे, प्रमुख कलाकार अंकुश चौधरी, सना केदार शिंदे, निर्माते संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे, संगीतकार अजय-अतुल, आणि पटकथा-संवाद लेखिका प्रतिमा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

केदार शिंदे अनेक वर्षांनी महाराष्ट्र शाहीर सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून त्यांचा सिनेमा घेऊन येत आहेत. हा भव्य दिव्य सिनेमा असून अजय - अतुल यांनी सिनेमाच्या संगीताची धुरा सांभाळली आहे. महाराष्ट्र शाहीर निमित्ताने अजय - अतुल आणि केदार शिंदे अनेक वर्षांनी एकत्र काम करत आहेत. सिनेमात शाहीर साबळेंची अनेक श्रवणीय गाणी प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत.

केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर सिनेमात अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत झळकणार आहे. २८ एप्रिल २०२३ ला महाराष्ट्र शाहीर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT