maharashtra shaheer unknown facts that meghana erande doing dubbing for this scene
maharashtra shaheer unknown facts that meghana erande doing dubbing for this scene  SAKAL
मनोरंजन

Maharashtra Shaheer: १०० % लोकांना माहित नाही की, महाराष्ट्र शाहीर मधल्या म्हातारीचा आवाज कोणी काढला!

Devendra Jadhav

Maharashtra Shaheer Movie News: महाराष्ट्र शाहीर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि सुपरहिट झाला. केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाल कामगिरी केली.

१ मे २०२३ ला महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर रिलीज झालेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या सिनेमातली एक खास गोष्ट आम्ही सांगणार आहोत जी अनेक लोकांना माहित नसलेच. तर आम्ही सांगतो..

(maharashtra shaheer unknown facts that meghana erande doing dubbing for this scene)

महाराष्ट्र शाहीर सिनेमातील एका सीनसाठी चक्क मराठी अभिनेत्रीने डबिंग केलंय. ती अभिनेत्री म्हणजे मेघना एरंडे. मेघना एरंडे एक कॉमेडी अभिनेत्री म्हणून आपल्या सर्वांना ठाऊक आहेच.

याशिवाय मेघना एक सुप्रसिद्ध डबिंग आर्टिस्ट आहे हे फार कमी जणांना ठाऊक असेल. मेघाने महाराष्ट्र शाहीर सिनेमातील एका प्रसंगाला आवाज दिलाय.

हा प्रसंग म्हणजे जेव्हा शाहीर मुंबईत गाण्याचं रेकॉर्डिंग करण्यासाठी जात असतात तेव्हा तिथे एक आजीबाई जेजुरीच्या खंडेराया जागराला या, अशी ओळ गात असतात.

शाहीर ही ओळ ऐकतात आणि ते आजीबाईंकडे जातात. शाहीर आजीबाईंना विनंती करतात की पुढची ओळ पण गा. पण आजीबाई तीच ओळ पुन्हा पुन्हा गुणगुणत असतात.

शेवटी शाहीर आजीबाईंना नमस्कार करून ST त बसून प्रवास करू लागतात. ST त प्रवास करताना शाहिरांना आजीबाईंची ती ओळ आठवते. या आजीबाईंना डबिंग मध्ये मेघना एरंडेने आवाज दिलाय.

मेघनाने हा संपूर्ण प्रसंग सोशल मीडियावर शेअर करत पोस्ट लिहिली आहे की.. २५ सप्टे‌ंबरला मला अतुल दादा चा कॉल आला.. त्याच्या base voice मध्ये खूप छान briefing दिलं.

वयस्क व्यक्तीच्या आवाजात ती ओळ कशी म्हणायची ते सांगितलं आणि म्हणून ही दाखवलं.. मला खूप टेन्शन आलं... तर त्यांनी voice note पाठवून pilot बनवून दिले..

मेघना पुढे लिहिते .. "मी घाबरत घाबरत खूप takes pathavle... त्यावर "Good Job .. Very nice " असा मेसेज आला.. मला वाटलं . फक्त refrence साठी असावी ही लाईन... तर चक्क ती चित्रपटात ठेवली.. मला खूप आनंद झाला आणि मज्जा आली ...

एक ओळ का होईना पण अजय अतुल साठी....आणि ती ही इतक्या मोठ्या सिनेमा साठी. It means a lot.. Ringa ringa च्या music launch नंतर पहिल्यांदा मला अजय अतुल दादा कडे कामची संधी मिळाली..."

अशी पोस्ट करत मेघनाने हा सर्व किस्सा सांगितला. अशाप्रकारे महाराष्ट्र शाहीर सिनेमात खारीचा का होईना मेघनाचा वाटा आहे. महाराष्ट्र शाहीर सिनेमा सध्या Amazon Prime Video वर पाहता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवालांचे एका दिवसात 800 कोटींचे नुकसान; शेअर बाजारात नेमकं काय झालं?

Met Gala 2024 : Met Gala कसा बनला फॅशन जगतातला ऑस्कर ? जाणून घ्या यंदाची थीम अन् इतिहास

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

SCROLL FOR NEXT