Maharashtra Shahir Actress Sana Shinde exclusive Podcast Esakal
मनोरंजन

Sana Shinde:'बहरला हा मधुमास नवा..' सध्या ट्रेन्डिंगला आहे हे गाणं..सनानं केला गाण्याच्या हूक स्टेप मागचा मोठा खुलासा

'महाराष्ट्र शाहीर' सिनेमाची अभिनेत्री सना शिंंदेनं ईसकाळ पॉडकास्ट मुलाखतीत या सिनेमाविषयीच्या अनेक इंट्रेस्टिंग गोष्टी शेअर केल्या आहेत.

प्रणाली मोरे

Sana Shinde Exclusive: केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमातनं त्याची मुलगी सना शिंदे मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करतेय. सध्या या सिनेमात तिच्यावर चित्रित झालेलं 'बहरला हा मधुमास नवा..' हे गाणं सोशल मीडियावर भलतंच ट्रेन्डिंगला आलं आहे. गाण्या इतकंच लोकांना आवडतायत ते त्या गाण्याच्या स्टेप्स.

सोशल मीडियावर या गाण्याच्या रील्सचा पाऊस पडतोय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. सर्वसामान्यच नाही तर सेलिब्रिटी देखील या गाण्यावर ताल धरताना दिसत आहेत. सनाचा हा पहिलाच सिनेमा त्यातही थेट अंकुश चौधरीसोबत काम करण्याची संधी.

लहानणापासून ज्याला आपण 'काका' म्हणत आलो त्याच्यासोबत सिनेमात रोमॅंटिक सीन शेअर करताना सनानं स्वतःला कसं तयार केलं.. तसंच 'बहरला हा मधुमास..' या गाण्याच्या हूकस्टेपमागची इंट्रेस्टिंग स्टोरी अशा अनेक गोष्टी नवोदित अभिनेत्री सना शिंदेनं 'ईसकाळ'शी मनमोकळ्या गप्पा मारत शेअर केल्या आहेत.

बातमीत पॉडकास्ट मुलाखतीची लिंक जोडलेली आहे. तेव्हा सनानं साधलेला इंट्रेस्टिंग संवाद ऐकण्यासाठी नक्की ऐका ही पॉडकास्ट मुलाखत. (Maharashtra Shahir Actress Sana Shinde Podcast Kedar Shinde daughter)

महाराष्ट्र शाहीर सिनेमातील श्रेया घोषाल हिच्या आवाजातील आणि सना शिंदेवर चित्रित झालेल्या 'बहरला हा मधुमास नवा..' या गाण्यानं सध्या सोशल मीडियावर भलताच धुमाकूळ घातला आहे. याच गाण्याविषयी बोलताना सनानं याच्या मेकिंग मागचे अनेक किस्से शे्अर केले आहेत.

या गाण्याच्या सुरांवर अन् यातील हूकअप स्टेपवर सध्या सगळेच ताल धरतायत. पण ही स्टेप नेमकी आली कुठून अन् कशी यावर देखील सनानां या पॉडकास्ट मुलाखतीत खुलासा केला आहे. तेव्हा हे इंट्रेस्टिंग किस्से ऐकण्यासाठी सनाची पॉडकास्ट मुलाखत नक्की ऐका.

शाहिर साबळे ज्यांच्या जीवनचरित्रावर आधारित आहे 'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा. आणि सनाचे ते पणजोबा...आणि सिनेमात सना ज्या भानुमती साबळे यांची व्यक्तिरेखा साकारतेय त्या तिच्या पणजी.

त्यामुळे आपल्या पणजीसारखं दिसण्यासाठी...तिच्यासारखं चालण्या-बोलण्याची तयारी करताना कशी तयारी केली याचाअनुभही सनानं शेअर केला आहे. तसंच या भूमिकेसाठी जेव्हा पहिली लूक टेस्ट झाली तेव्हा काय होती सगळ्यांची रिअॅक्शन हा किस्सा तर भन्नाट आहे. तेव्हा सना शिंदेनं साधलेला मनमोकळा संवाद ऐकण्यासाठी नक्की ही पॉडकास्ट मुलाखत ऐका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोने झाले महाग, चांदीतही २१०० रुपयांची वाढ; तुमच्या शहरातील आजचा भाव जाणून घ्या

Pune-Nashik Highway: पुणे-नाशिक महामार्ग १० तास ठप्प; मंचरमधील आंदोलनाचा फटका; वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल..

Latest Marathi News Live Update : एक दिवस राज्य माझा ताब्यात द्या, ईव्हीएमचा घोळ बाहेर काढतो - आमदार उत्तम जानकर

Kolhapur Kalamba Jail : कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये सापडली जिवंत काडतूसे, पुण्यातील आंदेकर टोळी कनेक्शन? सुरक्षा यंत्रणांना दिला चकवा

Pune School Controversy: शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे कापले केस; स्वतंत्र शुल्क आकारल्याची माहिती

SCROLL FOR NEXT