maharashtra shahir world tv premiere on pravah picture ankush chaudhari kedar shinde  SAKAL
मनोरंजन

Maharashtra Shahir: केदार शिंदे-अंकुश चौधरींचा 'महाराष्ट्र शाहीर' पाहा घरबसल्या! या तारखेला दिसणार टीव्हीवर

'महाराष्ट्र शाहीर' सिनेमा आता टीव्हीवर दिसणार आहे

Devendra Jadhav

Maharashtra Shahir News: २०२३ मध्ये अनेक मराठी सिनेमे गाजले. या सिनेमांनी प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंच शिवाय बॉक्स ऑफीसवर सुद्धा चांगली कमाई केली. यातलाच एक सिनेमा म्हणजे 'महाराष्ट्र शाहीर'. 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

'महाराष्ट्र शाहीर' सिनेमा ज्यांना थिएटरमध्ये पाहता आला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. 'महाराष्ट्र शाहीर' आता टीव्हीवर घरबसल्या पाहता येणार आहे.

'महाराष्ट्र शाहीर' या तारखेपासून टीव्हीवर

'महाराष्ट्र शाहीर' सिनेमा आता टीव्हीवर घरबसल्या पाहण्याचा आनंद मिळणार आहे. १८ फेब्रुवारीला दुपारी १ आणि रात्री ८ वाजता 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमा प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे.

'महाराष्ट्र शाहीर' ज्यांना थिएटरमध्ये पाहता आला नाही त्यांना टीव्हीवर बघण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट काही महिन्यांपुर्वी ओटीटीवर रिलीज झाला.  केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा 2 जून 2023 ला एमेझॉन प्राइम या ओटीटी साईट वर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे ज्यांनी आतापर्यंत हा चित्रपट पाहिला नाही त्यांच्यासाठी ही ओटीटी शिवाय टीव्हीवर हा सिनेमा पाहण्याची पर्वणी असणार आहे.

गेल्या अनेक वर्षांमध्ये अंकुश चौधरीने 'महाराष्ट्र शाहीर' हा केलेला पहिला बायोपिक आहे. अंकुशची प्रमुख भूमिका असलेला आणि केदार शिंदेंनी दिग्दर्शित केलेला 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला.

या सिनेमात केदार शिंदेंची लेक सना शिंदेने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. याशिवाय अश्विनी महांगडे, शुभांगी सदावर्ते या अभिनेत्रींनी सिनेमात विशेष भूमिका साकारल्या. सिनेमातील 'बहरला हा बधुमास' हे गाणं चांगलंच गाजलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT