maharashtrachi hasya jatra fame actor prabhakar more shared emotional post for mother on Mother's Day
maharashtrachi hasya jatra fame actor prabhakar more shared emotional post for mother on Mother's Day sakal
मनोरंजन

Mother's Day: आयुष्यातील प्रत्येक दिवस.. हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे यांची आईसाठी भावूक पोस्ट..

नीलेश अडसूळ

Prabhakar More shared post for his mother : मराठी टीव्ही मनोरंजन विश्वात महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे. अनेक वर्षांपासून हास्यजत्रेनं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे.

त्यातील कलाकारांसोबत प्रेक्षकांचे एक भावनिक नाते तयार केले आहे. आता या मालिकेतील एक प्रसिद्ध कलाकार प्रभाकर मोरे. प्रभाकर मोरे यांच्या चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. त्यांच्या स्किट मधील त्यांचे शालू.. हे गाणे जवळपास जगभरात प्रसिद्ध झाले आहे.

'कोकणचे पारसमणी' म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा प्रभाकर मोरे यांनी सोशल मीडियावर आपल्या आईसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यांच्या या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

(maharashtrachi hasya jatra fame actor Prabhakar more shared an emotional post for his mother on Mothers Day 2023 )

प्रभाकर मोरे यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आईचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी आईप्रती आपल्या भावना देखील व्यक्त केली आहेत. या पोस्ट मध्ये प्रभाकर मोर लिहितात की, ''आईसाठी दिवस नसतो तर आयुष्याचा प्रत्येक दिवसच आईमुळे असतो.''

त्यांनी लिहिलेला हा खास संदेश सगळ्यांचेच लक्ष वेधून गेला आहे. यावरून त्यांचे आणि त्यांच्या आईमधील जिव्हाळ्याचं नातं दिसून येतं. आहे. प्रभाकर मोरे यांच्या या पोस्टची सध्या बरीच चर्चा आहे.

maharashtrachi hasya jatra fame actor prabhakar more shared emotional post for mother on Mother's Day

उदया 14 मे रोजी जागतिक मातृ दिन म्हणजेच 'वर्ल्ड मदर्स डे' आहे. या निमित्ताने सर्वजन आवर्जून आईविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करतात. यामध्ये कलाकार मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर आपल्या आईविषयी लिहितात, फोटो शेयर करतात. अशीच एक पोस्ट प्रभाकर मोरे यांनी शेयर केली आहे.

प्रभाकर हे मूळचे रत्नागिरीतील आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते मनोरंजन विश्वात कार्यरत असून एक उत्तम कसलेला विनोदी अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Tampering Case: वायकरांच्या मेहुण्यापाठोपाठ ठाकरे गटाचे आमदार देखील अडचणीत, फेरमतमोजणी प्रकरणी नवा ट्विस्ट

Video Jayant Patil : "जयंत पाटलांचा विरोध तुम्ही बघितलेला नाही, टोकाला जायला...", विशाल पाटील अन् कदमांना इशारा, काय आहे प्रकरण?

Kitchen Hacks : सुका मेवा लगेच होतो खराब? मग 'या' टिप्स वापरून पाहा, वर्षभर राहतील ताजे अन् खराबही होणार नाही

VIP Culture End: आता मंत्र्यांना लाईट बिल स्वतःच्या खिशातून भरावं लागणार; 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय Video Viral

Chandu Champion : "रडून रडून माझी अवस्था वाईट झाली"; चंदू चॅम्पियनचं शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी केलं भरभरून कौतुक

SCROLL FOR NEXT