maharashtrachi hasya jatra fame actress vanita kharat first time talks on obesity and fatness sakal
मनोरंजन

Vanita Kharat: मला काहीच फरक पडत नाही, पण.. लठ्ठपणावर वनिता खरात जरा स्पष्टच बोलली..

अभिनेत्री वनिता खरात जाडेपणावर अत्यंत महत्वाचं बोलली आहे.

नीलेश अडसूळ

Vanita Kharat: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात तिच्या उत्तम विनोदी टायमिंगमुळे तिच्या फॅन्सच्या हृदयाची राणी झालीय. हास्य जत्रेतील तिच्या सर्वच पात्रांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे.

मग ते छोटी पोरगी असो, मामी असो किंवा सासूबाईचे पात्र.. वनिता स्टेजवर आली म्हणजे ती यंग लावून जाते. जितकी ती मंचावर हजरजबाबी आहे, तितकीच ती खऱ्या आयुष्यात ही आहे, आणि प्रचंड बेधडक आहे.

तिचे न्यूड फोटो असो किंवा खासगी आयुष्यातील चर्चा.. तिने कायमच सर्वांना सडेतोड उत्तम दिलं आहे. आजवर वनिता आपल्या जाडेपणावर वनिता कधी फारशी बोलली नाही, पण एका मुलाखतीतत तिने याविषयी अगदी रोखठोक विचार मांडले आहेत.

(maharashtrachi hasya jatra fame actress vanita kharat first time talks on obesity and fatness)

वनिता शरीराने लठ्ठ असली तरी तिचा जाडेपणा कधीही तिच्या कामच्या आड आला नाही. उलट ती लठ्ठ असूनही इतका दमदार अभिनय करते की सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळून राहतात. याच जाडेपणाचा तिला त्रास होतो का, तिला काय वाटतं, या विषयी नुकतीच ती एका मुलाखतीत बोलली आहे.

वनिता म्हणाली की, मला लठ्ठपणावरून अनेकदा लोक बोलतात, मी त्याकडे लक्ष देत नाही. याचा अर्थ मी लठ्ठपणाला प्रमोट करतेय असं नाहीय. कारण लठ्ठपणा हा वेगवेगळ्या पद्धतीने आलेला असतो. ' (Maharashtrachi Hasyajatra)

'कुणाचे हार्मोन चेंज होऊन लठ्ठपणा येतो, तर कुणाला इतर कोणत्याही कारणामुळे. लठ्ठपणापेक्षा फिट राहणं गरजेचं आहे. कारण एका वयानंतर लठ्ठपणा आपल्यासाठी त्रासदायकही होऊ शकतो.'

पुढे वनिता म्हणाली की, 'समाजाने एक चौकट बनवून ठेवली. मग बारीक असलेला, अॅब्स असलेला माणूसच सुंदर आहे, ही चौकटच चुकीची आहे. लठ्ठ असणं हे चुकीचं नाहीय.'

'तुमच्या लठ्ठपणामुळे जर तुम्हाला त्रास होत असेल तर ते चुकीचंच आहे. त्यामुळे त्यावर काम करणं गरजेचं आहे. म्हणून लठ्ठपणा वाईट आहे असं मी म्हणत नाही. दिसणं आणि तुमची बॉडी हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. दिसण आणि फिट राहणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत".

"मी जाड असून मी फिट आहे. मला काहीच फरक पडत नाही. मी छान धावू शकते, फिरू शकते, उठू शकते तर मग काय प्रोब्लेम आहे. मी फिट आहे. पण जर मी फिट नसेल तर त्यावर आपण काम करणं गरजेचं आहे. पण त्यासाठी आधी मी स्वत:ला स्वीकारणं गरजेचं आहे.'' अशा शब्दात वनिताने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाचे उद्घाटन चर्चेत

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT