Rohit mane, maharashtrachi hasyajatra SAKAL
मनोरंजन

Rohit Mane: समुद्रकिनारी हास्यजत्रातील अभिनेत्याने घेतलं बायकोचं चुंबन.. रोमँटिक फोटो व्हायरल

रोहित सध्या एका वेगळ्याच आणि रोमँटिक कारणामुळे चर्चेत आलाय.

Devendra Jadhav

Maharashtrachi Hasyajatra Rohit Mane: महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील सावत्या या नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजे रोहित माने. रोहित माने त्याच्या सहज आणि अचूक विनोदी टायमिंगमुळे अल्पावधीतच महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये लोकप्रिय झाला.

आसपास अनेक लोकप्रिय कलाकार असूनही रोहितची खास शैली सर्वांच्या पसंतीस उतरली. रोहित सध्या एका वेगळ्याच आणि रोमँटिक कारणामुळे चर्चेत आलाय.

(maharashtrachi hasyajatra actor Rohit mane has posted a special kissing photo with his wife)

रोहितच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने रोहितने त्याच्या बायकोसोबतच खास किसिंग फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. समुद्रकिनारी खास रोमँटिक पोझ देत रोहित आणि त्याची पत्नी यांचा हा खास फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

रोहितच्या बायकोचं नाव श्रद्धा किरवे. रोहित बायको श्रद्धासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. रोहित आणि श्रद्धाने लाईट ग्रीन रंगाचे मॅचिंग कपडे परिधान केले असून एकमेकांना किस केलंय

रोहित माने आणि श्रद्धा किरवे यांनी १२ फेब्रुवारी २०२१ ला लग्न केलं. दोघांच्या लग्नाला आज दोन वर्ष पुर्ण झाली आहेत. रोहित आणि श्रद्धा एकमेकांसोबतचे फोटो आणि रील व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. दोघांच्याही रोमँटिक फोटो आणि व्हिडिओला त्यांचे चाहते प्रेम दर्शवत असतात. रोहितची बायको श्रद्धा ही HR असून ती शाहरुख खानची मोठी फॅन आहे.

रोहित काहीसा उशिराच महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमसोबत सहभागी झाला. पण काहीच भागांमध्ये रोहितने त्याच्या अभिनयाची चुणूक सर्वांना दाखवली. गौरव मोरे, वनिता खरात, चेतना भट अशा अनेक सहकलाकारांसोबत रोहितने केलेले विनोदी स्किट प्रचंड गाजले.

रोहितच्या खास विनोदी अभिनयामुळे त्याचं फॅन फॉलोइंग सुद्धा वाढलं आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते बुधवार रात्री ९ वाजता सोनी मराठीवर सुरु आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यातील अपघाताची मालिका काही थांबेना! मध्यरात्री सात ते आठ गाड्यांचा विचित्र अपघात; पाहा VIDEO

पती रस्त्यावर तडफडत होता, पत्नीने हात जोडले तरी कुणी थांबलं नाही, रुग्णालयात नेण्याआधी मृत्यू

Ladki Bahin Yojana: १७ तारीख उजाडली, पण लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे नाहीत… नेमका अडथळा कुठे? मोठी अपडेट समोर

Mumbai News: मराठी माणसा... जागा हो, मुंबई वाचव..! अज्ञाताकडून शहरात ठिकठिकाणी फलकबाजी; राजकीय वर्तुळात खळबळ

Manikrao Kokate Resignation : क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब? अजित पवार–फडणवीस भेटीने खळबळ

SCROLL FOR NEXT